सबळ पुरावे सादर करण्यास पोलिसांना अपयश; सत्र न्यायालयाकडून दोघांची निर्दोष मुक्तता
By रतींद्र नाईक | Updated: October 12, 2023 21:04 IST2023-10-12T21:04:15+5:302023-10-12T21:04:29+5:30
न्यायालयाने आरोपींची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

सबळ पुरावे सादर करण्यास पोलिसांना अपयश; सत्र न्यायालयाकडून दोघांची निर्दोष मुक्तता
मुंबई : आरोपींविरोधात सबळ पुरावे सादर करण्यास पोलिसांना अपयश आल्याने मुंबईसत्र न्यायालयाने दोघा आरोपींची पोक्सो कायद्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. इतकेच नव्हे तर न्यायालयाने आरोपींची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.
सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर दोघा आरोपींनी लैंगिक अत्याचार केला असून पीडितेने एका बाळाला जन्म दिला. हे बाळ एका इमारती खाली बेवारस सोडून देण्यात आले. तपासा अंती पोलिसांनी दोघा आरोपींविरोधात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली. याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यादरम्यान पोलिसांना आरोपींविरोधात सबळ पुरावे सादर करता आले नाहीत इतकेच नव्हे तर एका आरोपीने आपण पीडितेशी लग्न करण्यास तयार असल्याची कबुली दिली. विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश अदिती कदम यांनी सदर बाब लक्षात घेत दोघा आरोपींची निर्दोष मुक्तता केली.