Join us  

विश्वास ठेवणाऱ्या बहिणींचीही फसवणूक, शिफू सनकृती प्रकरण

By admin | Published: May 04, 2017 5:06 AM

‘शिफू सनकृती’ प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सुनील कुलकर्णीचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. तरुण मुला-मुलींना

मुंबई : ‘शिफू सनकृती’ प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सुनील कुलकर्णीचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. तरुण मुला-मुलींना हेरून त्यांना सेक्स आणि ड्रग्सचा नाद लावण्याच्या आरोपानंतर आता ज्या दोन बहिणींना आश्रय देण्याचे ढोंग त्याने केले होते, त्यातील एका मुलीला कुलकर्णीने फसवल्याचे समोर आले आहे. बुधवारी न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. गुन्हे शाखेने कुलकर्णीच्या घरझडतीतून या मुलीचे चेकबुक जप्त केले. त्यातील एका चेकवर १५ लाख रुपयांची रक्कम टाकून चक्क या मुलीची खोटी स्वाक्षरी केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. कुलकर्णीच्या प्रतापांमुळे गुन्हे शाखेने त्याच्या कलमांत फसवणुकीच्या कलमांची वाढ केली आहे. त्याने हा चेक (चेक क्रमांक - १०२७१७ ) मैक्सीकॉन हेल्थ केयरच्या नावाने दिला होता. हे चेकबुक मुलीला दाखवले असता तिने चेकबुक तर ओळखले; पण सही आपली नसल्याचे सांगितले. शिवाय बँकेत तिचा पत्ताही बदलल्याचे तपासात समोर आले. याबाबत मुलीली काहीही माहिती नव्हती. कुलकर्णी इव्हेंट मॅनेजमेंट करतो. त्यासाठी मेसर्स रामानी आइसक्रीम लिमिटेड या भोपाळच्या कंपनीशी त्याने करार केला होता. हा करार याच मुलीच्या नावाने करण्यात आला. ज्याची कल्पना आपल्याला नसल्याचे या मुलीने पोलिसांना सांगितले आहे. (प्रतिनिधी)