Join us

इमानचा सहवास कायम लक्षात राहील! सैफी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांमध्ये हळहळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 2:20 AM

आपल्या कुटुंबीयांतील सदस्याप्रमाणेच काळजी घेतलेल्या इमानच्या मृत्यूची बातमी येताच सैफी रुग्णालयातील डॉक्टर्स व परिचारिका अक्षरश: हळहळल्या.

मुंबई : आपल्या कुटुंबीयांतील सदस्याप्रमाणेच काळजी घेतलेल्या इमानच्या मृत्यूची बातमी येताच सैफी रुग्णालयातील डॉक्टर्स व परिचारिका अक्षरश: हळहळल्या. मुंबईत आल्यापासून इमानसोबत घालविलेला प्रत्येक क्षण कायम स्मरणात राहील, अशा भावना इमानवर उपचार करणाºया चमूतील डॉ. अर्पणा भास्कर यांनी व्यक्त केल्या. इमान ८२ दिवस उपचारांसाठी मुंबईत होती. या कालावधीतील तिचे हसणे, जिद्दीने प्रयत्न करणे या सर्व गोष्टी आठवतात, असेही त्यांनी भावनाविवश होऊन सांगितले.चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयात इमानवर उपचार करणाºया डॉ. मुफ्फजल लकडावाला यांनीही ‘तुला विसरणे कधीच शक्य नाही, तुझे निरासग हसू कायम लक्षात राहील...’ अशा शब्दांत इमानला टिष्ट्वटरवरून श्रद्धांजली वाहिली.डॉ. अर्पणा यांनी इमानविषयी सांगितले की, इमानला रुग्णालयात आणण्यापासून ती परत सुखरूप जाईपर्यंतच्या प्रवासाची मी साक्षीदार होते. इमानच्या बहिणीने केलेल्या आरोप-प्रत्यारोपमुळे मतभेद झाले. तरीही मनात इमानबद्दल असलेली आस्था, प्रेम आणि ती बरी व्हावी यासाठी सुरूअसलेल्या प्रयत्नांमध्ये कणभरही उणीव राहिली नाही. ती मनस्वी आणि प्रेमळही होती. काही दिवसांपूर्वीच ती ठीक असल्याचे कळले होते. ती बरी व्हायला हवी होती, अशीच प्रत्येकाची कायम प्रार्थना होती.- सैफी रुग्णालयाचे बेरिअ‍ॅट्रिक सर्जन डॉ. मुफ्फजल लकडावाला आणि त्यांच्या टीमने इमानवर शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांच्या उपचारांमुळे इमानचे वजन १७० किलोपर्यंत कमी झाले. सहा परिचारिकांची टीम तिची देखरेख करत होती, परंतु मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तिच्या बहिणीने अबुधाबीला जाण्याचा निर्णय घेतला.मुंबईतील ते ८२ दिवस...भारतात ८२ दिवस उपचार घेतल्यानंतर इमान अबुधाबीला रवाना झाली. मुंबईतील सैफी रुग्णालयात इमानवर उपचार करण्यात आले. डॉ. मुफ्फजल लकडावाला यांच्या टीमने इमानवर मुंबईत उपचार केले. ११ फेब्रुवारीला इजिप्त एअरच्या कार्गो विमानाने इमान अहमद मुंबईत पोहोचली. इमानचे वजन तब्बल ५०० किलो होते. तिला मुंबईत आणण्यासाठी विमानात एक खास बेड बनवण्यात आला होता. तो बेड एका क्रेनच्या माध्यमातून उचलण्यात आला आणि इमानला पहिल्या मजल्यावरील तिच्यासाठी खास बनवण्यात आलेल्या रूममध्ये ठेवण्यात आले. इमानवर ७ मार्च २०१७ला यशस्वी बेरिअ‍ॅट्रिक सर्जरी करण्यात आली.