बनावट कोरोना अहवालाची पाच हजार रुपयांत विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 05:18 AM2021-03-11T05:18:39+5:302021-03-11T05:18:49+5:30

गाेवंडीतील प्रकार; थायरोकेअर लॅब चालकाला अटक

Fake Corona report sold for Rs 5,000 | बनावट कोरोना अहवालाची पाच हजार रुपयांत विक्री

बनावट कोरोना अहवालाची पाच हजार रुपयांत विक्री

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अवघ्या चार ते पाच हजार रुपयांत बनावट कोरोना अहवालाची विक्री करणाऱ्या गोवंडीतील लॅब चालकाला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. 
खार परिसरातील दाम्पत्याने जयपूरला जाण्यापूर्वी खार येथील थायरोकेअरच्या शाखेत कोरोना चाचणी केली. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र त्यांनी बनावट अहवाल पालिकेच्या डॉक्टरांना पाठवून, विमानतळ गाठले. डॉक्टरांच्या तक्रारीनंतर या कोरोनाबाधित दाम्पत्यावर कारवाई झाली.

दरम्यान, गोवंडीतील थायरोकेअर लॅबचा अधिकृत सर्व्हिस प्रोव्हायडर अब्दुल साजिद खान बनावट कोरोना अहवाल देत असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, थायरोकेअरच्या लीगल एक्झिक्युटिव्ह बिरुदेव सरवदे यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी त्याला मंगळवारी अटक केली. 
थायरोकेअरचे बनावट लेटरहेड आणि स्टॅम्पचा वापर करून तो अवघ्या चार ते पाच हजार रुपयांत काेराेेनाच्या बनावट अहवालाची विक्री करत होता. त्याने आतापर्यंत किती जणांना अशा प्रकारे बनावट अहवाल दिले? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
 

Web Title: Fake Corona report sold for Rs 5,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.