Join us

बनावट कोरोना अहवालाची पाच हजार रुपयांत विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 5:18 AM

गाेवंडीतील प्रकार; थायरोकेअर लॅब चालकाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अवघ्या चार ते पाच हजार रुपयांत बनावट कोरोना अहवालाची विक्री करणाऱ्या गोवंडीतील लॅब चालकाला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. खार परिसरातील दाम्पत्याने जयपूरला जाण्यापूर्वी खार येथील थायरोकेअरच्या शाखेत कोरोना चाचणी केली. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र त्यांनी बनावट अहवाल पालिकेच्या डॉक्टरांना पाठवून, विमानतळ गाठले. डॉक्टरांच्या तक्रारीनंतर या कोरोनाबाधित दाम्पत्यावर कारवाई झाली.

दरम्यान, गोवंडीतील थायरोकेअर लॅबचा अधिकृत सर्व्हिस प्रोव्हायडर अब्दुल साजिद खान बनावट कोरोना अहवाल देत असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, थायरोकेअरच्या लीगल एक्झिक्युटिव्ह बिरुदेव सरवदे यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी त्याला मंगळवारी अटक केली. थायरोकेअरचे बनावट लेटरहेड आणि स्टॅम्पचा वापर करून तो अवघ्या चार ते पाच हजार रुपयांत काेराेेनाच्या बनावट अहवालाची विक्री करत होता. त्याने आतापर्यंत किती जणांना अशा प्रकारे बनावट अहवाल दिले? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्या