विमा कंपनीची बनावट पॉलिसी पोलिसांकडे सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 01:49 AM2021-01-05T01:49:43+5:302021-01-05T01:49:48+5:30
शिवडीत भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार इक्बाल खान (५३) हे गंभीर जखमी झाले. खान यांच्या तक्रारीवरून कार चालक सईद अली अन्सारी याच्या विरोधात गुन्हा दाखल करून शिवडी पोलिसांनी तपास सुरू केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नामांकित विमा कंपनीची बनावट पॉलिसी पोलिसांकडे सादर केल्याप्रकरणी शिवडी पोलीस अधिक तपास करत आहेत. संबंधित विमा कंपनीकडून याबाबत तक्रार मिळताच पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
शिवडीत भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार इक्बाल खान (५३) हे गंभीर जखमी झाले. खान यांच्या तक्रारीवरून कार चालक सईद अली अन्सारी याच्या विरोधात गुन्हा दाखल करून शिवडी पोलिसांनी तपास सुरू केला.
दाखल गुन्ह्यात कार चालक अन्सारी याने पोलीस ठाणे येथे विमा कंपनीची कागदपत्रे सादर केली होती. त्याआधारे मोटार अपघात दावा न्यायालयाने विमा कंपनीला कागदपत्रे पाठवली. कंपनीने केलेल्या तपासात कंपनीचा पॉलिसी क्रमांक, पॉलिसीधारक व पॉलिसी कालावधीसंबंधी अभिलेख पडताळून पाहिला असता पॉलिसी सर्टिफिकेट बनावट असल्याचे समोर आले.
अखेर कंपनीतर्फे सचिन चाळके यांनी शिवडी पोलीस ठाणे येथे बनावट पॉलिसी प्रमाणपत्र सादर करून स्वतःचा आर्थिक फायदा होण्याच्या हेतूने संबंधित विमा कंपनीच्या नावाचा व चिन्हाचा वापर करून बनावट पॉलिसी बनवून ती खरी असल्याचे भासवून कागदपत्रे शिवडी पोलीस ठाणे येथे सादर करून फसवणूक केल्याची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे.
दाखल गुन्ह्यात कार चालक अन्सारी याने पोलीस ठाणे येथे विमा कंपनीची कागदपत्रे सादर केली होती. त्याआधारे मोटार अपघात दावा न्यायालयाने विमा कंपनीला कागदपत्रे पाठवली.