२९ गरजूंना विकले बनावट रेमडेसिविर इंजेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:07 AM2021-04-23T04:07:00+5:302021-04-23T04:07:00+5:30

पालघरमधून रूपेश गुप्ताला अटक; टिळकनगर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत घेतला शोध लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : व्हॉट्सॲपवरून स्वस्तात रेमडेसिविर ...

Fake Remedivir injection sold to 29 needy | २९ गरजूंना विकले बनावट रेमडेसिविर इंजेक्शन

२९ गरजूंना विकले बनावट रेमडेसिविर इंजेक्शन

Next

पालघरमधून रूपेश गुप्ताला अटक; टिळकनगर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत घेतला शोध

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : व्हॉट्सॲपवरून स्वस्तात रेमडेसिविर इंजेक्शन देत असल्याचा संदेश व्हायरल करून सावज जाळ्यात अडकताच बनावट रेमडेसिविर इंजेक्शनचे पार्सल पोहोचविणाऱ्या रूपेश गुप्ता याला पालघरमधून अटक करण्यात आली. टिळकनगर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत त्याचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या. त्याने आतापर्यंत २९ गरजूंना बनावट रेमडेसिविर विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

टिळकनगर परिसरात राहणाऱ्या मेघना हितेश ठक्कर (वय ३८) यांच्या नातेवाईक असलेल्या चेतन मिस्त्री यांना रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता असल्याने त्यांनी पंकज कोटक यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्यांनी व्हाॅट्सअपवरील गुप्ताचा संदेश पाठविला. त्यानुसार त्यांनी गुप्ताशी संपर्क साधून इंजेक्शनची मागणी केली. गुप्ताने त्यांना फक्त ६ इंजेक्शन शिल्लक असल्याचे सांगितले. त्यांनी गुप्तावर विश्वास ठेवून ६ रेमडेसिविरची ऑर्डर दिली. एका इंजेक्शनचे ३ हजार रुपये याप्रमाणे १८ हजार रुपये त्यांनी मिस्त्रीच्या गुगल पे वरून ट्रान्स्फर केले. पैसे दिल्यानंतर सोमवारी (दि. १९) रात्री त्यांना पार्सल मिळाले.

पार्सल उघडताच आतील थर्मल बॉक्समध्ये बर्फात ५ बाटल्या हाेत्या. त्यांवर कसलेच नाव नव्हते. त्यांना संशय आल्याने त्यांनी गुप्ताला कॉल केला, पण ताे नॉट रिचेबल हाेता. अखेर त्यांनी मंगळवारी दुपारी टिळकनगर पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक पुराव्याच्या आधारे तो पालघरला असल्याची माहिती त्यांना मिळाली. तपासाअंती त्याच्या मित्राच्या घरातून त्याला अटक करण्यात आली.

रूपेशने आतापर्यंत घाटकोपर, अंधेरी, बोरिवली आणि दादर अशा ठिकाणी एकूण २९ जणांना बनावट इंजेक्शन विकले असून त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे. तुम्हीही अशा प्रकारच्या एखाद्या टोळीच्या जाळ्यात अडकला असाल तर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

रेमडेसिविरऐवजी ट्राक्साॅलची विक्री

गुप्ताने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पालघर येथील महालक्ष्मी मेडिकल येथे काम करणारा त्याचा ओळखीचा मित्र श्रवण रजपूत याच्या सांगण्यावरून अँटिबायोटिक औषध ट्राक्साॅल एस हे १ ग्रॅम पावडर फाॅर्ममध्ये असून त्याचा साईड इफेक्ट होत नाही, अशी माहिती रूपेशला मिळाली हाेती. याची रेमडेसिविर म्हणून विक्री केल्यास आर्थिक फायदा होईल, असे समजताच त्याने सोशल मीडियाच्या आधारे बनावट इंजेक्शनची विक्री सुरू केली.

* ३ हजार रुपयांत विक्री

रूपेश ३ हजार रुपयांत बनावट रेमडेसिविरची विक्री करत होता. त्यासाठी तो वेगवेगळ्या मोबाईल क्रमांंकांचा वापर करीत होता. त्याच्या गुगल पे वरील क्रमांकाच्या आधारे पाेलिसांचे पथक त्याच्यापर्यंत पोहोचले.

...........................................

...

Web Title: Fake Remedivir injection sold to 29 needy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.