शिष्यवृत्तीच्या बनावट अर्जांना यापुढे लागणार लगाम...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 10:28 AM2023-11-22T10:28:01+5:302023-11-22T10:28:26+5:30

नोडल अधिकाऱ्यांचे केले जाणार बायोमेट्रिक प्रमाणीकरण

Fake scholarship applications to be curbed from now on... | शिष्यवृत्तीच्या बनावट अर्जांना यापुढे लागणार लगाम...

शिष्यवृत्तीच्या बनावट अर्जांना यापुढे लागणार लगाम...

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विद्यार्थ्यांची बोगस नोंदणी दाखवून सरकारी शिष्यवृत्ती लाटण्याच्या प्रकाराला पायबंद घालण्यासाठी एनएमएमएस आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीकरिता नोडल अधिकारी म्हणून काम करणाऱ्यांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारकडून आर्थिक दुर्बल घटकांना एनएमएमएस आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती दिली जाते. राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर (एनएसपी) दोन्ही योजनांसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरायचे आहेत. त्याकरिता शाळेचे जे अधिकारी विद्यार्थ्यांकडून अर्ज दाखल करतील त्यांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या सूचनेवरून ही खबरदारी प्रथमच घेण्यात येत आहे. शाळास्तरावर १५ डिसेंबरपर्यंत तर जिल्हास्तरावर ३० डिसेंबरपर्यंत नोडल अधिकाऱ्यांनी अर्जांची पडताळणी करायची आहे.

काय काळजी घ्याल?
 एनएमएमएस शिष्यवृत्तीकरिता विद्यार्थ्यांचे नाव व जन्मतारीख आधारनुसार असावी
 निकालपत्रकातील नाव व जन्मतारीख यात दुरुस्ती असल्यास नववीच्या नवीन विद्यार्थ्यांचे प्रस्ताव शाळांनी शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत पाठवावे.
 दिव्यांगत्वाचा प्रकार यूडीआयडी ओळखपत्र आणि एनएसपी पोर्टलवरील अर्ज यात एकसमान असावा.
कुणाची बायोमॅट्रिक
शाळा प्रमुख (एच.ओ.आय), नोडल अधिकारी (आय.एन.ओ), जिल्हा शिक्षणाधिकारी (डी.एन.ओ) आणि राज्य नोडल अधिकारी (एस.एन.ओ)

शाळांनी एन.एस.पी २.० पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी दरवर्षी प्रोफाइल अद्ययावत करणे आवश्यक आहे. तसेच केवायसी पडताळणी एकदाच करून घेणे आवश्यक आहे. विद्यार्थी ज्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे, त्या शाळेमधूनच ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे. 
- राजेश क्षीरसागर, 
उपसंचालक, योजना शिक्षण

२.६६ लाख विद्यार्थी देणार ‘एनएमएमएस’साठी परीक्षा
एनएमएमएस शिष्यवृत्तीकरिता राज्य परीक्षा परिषदेकडून आठवीच्या विद्यार्थांची परीक्षा घेण्यात येते. २४ डिसेंबरला ही परीक्षा ७३० केंद्रांवर होणार असून, यासाठी १३ हजार ५२३ शाळातील २ लाख ६६ हजार २०२ विद्यार्थी बसणार आहेत.

Web Title: Fake scholarship applications to be curbed from now on...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.