वडिलांकडून पैसे काढण्यासाठी स्वतः च्याच अपहरणाचा बनाव; पाच तासांत गुन्ह्यांची उकल

By मनीषा म्हात्रे | Published: June 1, 2023 06:05 PM2023-06-01T18:05:52+5:302023-06-01T18:06:50+5:30

बांगुर नगर पोलिसांची कामगिरी.

faking his own kidnapping to extract money from his father crimes are solved within five hours | वडिलांकडून पैसे काढण्यासाठी स्वतः च्याच अपहरणाचा बनाव; पाच तासांत गुन्ह्यांची उकल

वडिलांकडून पैसे काढण्यासाठी स्वतः च्याच अपहरणाचा बनाव; पाच तासांत गुन्ह्यांची उकल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कामावरून सुटलेला मुलगा घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. काही तासांत मुलगा सुखरूप हवा असल्यास पाच लाखांच्या मागणीचा कॉल आला. या घटनेने खळबळ उडाली. बंगुर नगर पोलिसांनी वेगवेगळी तपास पथके कामाला लावून तरुणाचा शोध सुरू केला. अवघ्या काही तासांतच गुन्ह्याची उकल करत तरुणाची सुटका करण्यास त्यांना यश आले. तपासात, वडिलांकडून पैसे काढण्यासाठी मुलानेच अपहरणाचा बनाव केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

दहिसर परिसरात राहणारे तक्रारदार दिनेशलाल नारायण जोशी (४८) यांचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचा मुलगा जितेंद्र जोशी (२७) हा मंगळवारी रात्री गोरेगाव लिंक रोड येथून कामावरून घरी निघाला. मात्र बराच वेळ झाला तरी घरी परतला नाही. त्यानंतर, रात्री दोनच्या सुमारास जितेंद्र यांच्या पत्नीच्या मोबाईलवर व्हॉट्सअँप कॉल आला. मुलाच्या सलामतीसाठी बुधवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत  पाच लाखांची मागणी केली. पैसे न दिल्यास व पोलीस व इतर कोणाला कळविल्यास त्याला जिवेठार मारण्याची धमकी दिली.

जोशी कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. वेगवेगळी तपासपथके तयार करून वरिष्ठाचे मार्गदर्शनाखाली मुलाच्या मोबाईल लोकेशन तसेच त्याचा येण्याच्या जाण्याच्या मार्गावरील जवळपास १०० सीसीटिव्ही तपासले. अवघ्या काही तासांत त्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. तपासात त्यानेच स्वतः च्या अपहरणाचा बनाव रचल्याचे समोर येताच त्याला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रमोद तावडे पोलीस निरिक्षक भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली बांगुरनगर लिंकरोड पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी आणि अंमलदार यांनी ही कारवाई केली आहे.

असा रचला कट 

जितेंद्र कडे केलेल्या चौकशीत, त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या एका कामगाराला जितेंद्र जोशी यांनेच ४ ते ५ दिवसापुर्वी तो एका अडचणीत असल्याचे सांगितले. त्यातून सुटण्यासाठी त्याचे स्वतःचे अपहरण करून वडिलांकडून पैसे वसुल करण्याबाबत कट आखला. यामध्ये मदत न केल्यास त्याची नोकरी घालविण्याची धमकी दिल्याने त्याने त्याला मदत करण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे  ३१ मे रोजी जितेंद्र कामावरून सुटल्यानंतर त्याने मित्राकडून पत्नीला फोन लावून वडिलांकडून पाच लाख रुपये आणून देण्यास सांगितले. 

Web Title: faking his own kidnapping to extract money from his father crimes are solved within five hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.