भाजीपाल्याच्या दरांत घसरण; शेवगा, वाटाणा, दोडक्याचा तोरा कमी; फरसबी, कोबी, गवार तेजीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 09:48 AM2024-07-02T09:48:24+5:302024-07-02T09:49:21+5:30

संपूर्ण जून महिन्यात भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. पण, जुलैच्या पहिल्याच दिवशी भाजीपाल्याचे दर कमी  झाले आहेत. 

Fall in vegetable prices; Low tora of fenugreek, peas, dodka; Peas, Cabbage, Guar are booming | भाजीपाल्याच्या दरांत घसरण; शेवगा, वाटाणा, दोडक्याचा तोरा कमी; फरसबी, कोबी, गवार तेजीत

भाजीपाल्याच्या दरांत घसरण; शेवगा, वाटाणा, दोडक्याचा तोरा कमी; फरसबी, कोबी, गवार तेजीत

नवी मुंबई - जून महिन्यात भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. जुलैच्या पहिल्याच दिवशी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या होलसेल मार्केटमध्ये दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. शेवगा, वाटाणा, दोडकासह  पालेभाज्यांचे दरही कमी झाले असून, फरसबी, गवार, कोबीचे दर अद्याप तेजीमध्ये आहेत. 

बाजार समितीमध्ये राज्याच्या विविध भागातून ५८६ ट्रक, टेम्पोमधून २२६४ टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. यामध्ये ४ लाख ७९ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. पाऊस लांबल्यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन कमी झाले होते. यामुळे संपूर्ण जून महिन्यात भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. पण, जुलैच्या पहिल्याच दिवशी भाजीपाल्याचे दर कमी  झाले आहेत. 

काकडी स्थिर
गवार, काकडीचे दर स्थिर असून, फरसबी, कोबीचे दर वाढले आहेत. कांदापात, कोथिंबीर, पुदिना, शेपूच्या दरामध्येही घसरण झाली आहे. आवक वाढू लागल्यामुळे दर कमी झाले असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली असून, आवक कशी होणार यावर बाजारभाव अवलंबून राहण्याची शक्यताही वर्तविली आहे.

पालेभाज्याचा प्रती 
जुडी १ जुलैचा दर 
कांदापात जुडी    १० ते १५
कोथिंबीर    २० ते २२
मेथी    १८ ते २०
पालक    १० ते १५
पुदिना    ९ ते १० 
शेपू    १५ ते २०

 

Web Title: Fall in vegetable prices; Low tora of fenugreek, peas, dodka; Peas, Cabbage, Guar are booming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.