लॉकडाऊनमुळे नायट्रोजन आॅक्साइडच्या प्रमाणात कमालीची घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 06:01 PM2020-04-05T18:01:26+5:302020-04-05T18:01:56+5:30

मुंबई शहराच्या हवा-प्रदुषणाच्या पातळी मध्ये १७ मार्चपासूनच घट झाल्याचे समोर आले आहे.

The fall in nitrogen oxide volume decline due to lockdown | लॉकडाऊनमुळे नायट्रोजन आॅक्साइडच्या प्रमाणात कमालीची घसरण

लॉकडाऊनमुळे नायट्रोजन आॅक्साइडच्या प्रमाणात कमालीची घसरण

googlenewsNext

मुंबई : मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेच्या पातळीचे विश्लेषण करण्यासाठी वातावरण संस्थेने सिपिसिबीच्या संकेत स्थळावरील आकडेवारीचा उपयोग केला आहे. २५ मार्च रोजी रात्री १२ वाजता करण्यात आलेल्या देशव्यापी बंदच्या घोषणेअगोदरच मुंबई शहर हे राज्याने घोषित केलेल्या लॉकडाऊनचे पालन करत होते. याचाच परिणाम म्हणून मुंबई शहराच्या हवा-प्रदुषणाच्या पातळी मध्ये १७ मार्चपासूनच घट झाल्याचे समोर आले आहे.

कोरोनाला हरविण्यासाठी लॉक डाऊन करण्यात आले असतानाच मुंबईकरांनी याच काळात प्रदूषणालादेखील हरविले आहे. कारण लॉक डाऊनमुळे हवा प्रदूषित करणारे घटक नियंत्रणात असल्याने साहजिकच मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी हवेची गुणवत्ता चांगली, उत्तम व समाधानकारक नोंदविण्यात येत आहे. विशेषत: रस्त्यांवर वाहने नसल्याने हवेतील प्रदूषण मोठया प्रमाणावर कमी झाले असून, लॉक डाऊनमुळे कोरोनाला हरविताना मुंबईकर प्रदूषणालदेखील हरवित असल्याचे चित्र आहे.

देशात सर्वत्र लॉक डाऊन आहे. मुंबईतही काही वेगळी स्थिती नाही. त्यामुळे घड्याळ्याच्या काटयावर धावणारी मुंबईत स्थिर झाली आहे. लोकल जागीच उ•या आहेत. विमान सेवा बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु असून, रस्त्यांवरील वाहतूक सेवा पुर्णपणे बंद आहे. परिणामी रस्त्यांवर वाहनांची गर्दी नसल्याने साहजिकच हवेतील प्रदूषण कमी झाले आहे. विशेषत: बीकेसी, चेंबूर, माझगाव आणि चेंबूर सारख्या परिसरातील हवेची गुणवत्ता चांगली नोंदविण्यात येत आहे. बीकेसी आणि चेंबूर येथील हवा सातत्याने खराब नोंदविण्यात आली होती. बिझनेस हब म्हणून ओळख असलेल्या बीकेसीने तर प्रदूषणाचा स्तर केव्हाच ओलांडला होता. मात्र आता लॉक डाऊनचा फायदा येथील प्रदूषण कमी करण्यासाठी होत आहे.

पश्चिम उपनगराचा विचार करता अंधेरी, मालाड येथील हवादेखील यापूर्वी खराब नोंदविण्यात आली होती. माझगाव देखील खराब हवेच्या यादीत गेले होते. मात्र आता येथील हवेतील गुणवत्ता सुधारते आहे. मुळात रस्त्यांवरील वाहनांचे प्रमाण कमी होणे, इमारतींची बांधकामे थांबणे, प्रकल्पांच्या कामाचा वेग कमी होणे; अशा अनेक घटकांत घट होत असल्याने मुंबईची हवा सध्या तरी चांगली नोंदविण्यात येत असल्याचे चित्र आहे.
-----------------------
मुंबईतील ९ वेगवेगळ्या ठिकाणांच्या (वांद्रे, बोरीवली, कुलाबा, सी.एस.आय.ए (विमानतळ), कुर्ला, पवई,सायन, विलेपार्ले आणि वरळी.) हवा-प्रदूषणाच्या पातळीचा-आकडेवारीचा  तुलनात्मक अ•यास करण्यात आला आहे.
-----------------------
१७ मार्च ते २२ मार्च २०२० या कालावधीत वांद्रे व कुर्ला या परिसरात हवा-प्रदुषणात  आत्तापर्यंत ची सर्वात मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. यापैकी वांद्रे परिसरात नायट्रोजन डायआॅक्साइडच्या प्रमाणात म्हणजेच ८१% इतकी तर कुर्ला परिसरात ९२% इतकी कमालीची घट किंवा घसरण झाल्याचे या विश्लेषणातून समोर आले आहे.
-----------------------
 १७ मार्च ते २२ मार्च २०२० या कालावधीतील आकडे वारीचे वर्गीकरण पुढील प्रमाणे
नायट्रोजन डायआॅक्साइडच्या प्रमाणात ८४% घट झाली.
पीएम २.५ च्या प्रमाणात ७५.८% घट झाली.
पीएम १० च्या प्रमाणात ७२.३% घट झाली.
कार्बन मोनो आॅक्साइडच्या प्रमाणात ७५% घट झाली.
नायट्रोजन मोनोआॅक्साइडच्या प्रमाणात ८६.२% इतकी केवळ सहा दिवसात घट झाल्याचे या विश्लेषणात आढळून आले आहे.

Web Title: The fall in nitrogen oxide volume decline due to lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.