कोसळलेली झाडे पुन्हा जिवंत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 06:59 PM2020-08-13T18:59:27+5:302020-08-13T19:00:18+5:30

झाडे जिवंत स्वरुपात पुन्हा उभी राहावीत याकरिता महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी एकत्र आले आहेत.

The fallen trees come alive again | कोसळलेली झाडे पुन्हा जिवंत

कोसळलेली झाडे पुन्हा जिवंत

googlenewsNext


मुंबई :  गेल्या आठवड्यात सोमवारपासून गुरुवारपर्यंत मुंबईत मोठया प्रमाणावर पाऊस पडला. विशेषत: दक्षिण मुंबईला मोठया पावसाने झोडपले. ताशी १२० किमी वेगाने वारे वाहिले. यावेळी मोठया प्रमाणात झाडे कोसळली. फोर्ट येथील ज.जी. कला महाविद्यालयाच्या प्रांगणात देखील मोठया प्रमाणात झाडे कोसळली. परिणामी कोसळलेली ही झाडे जिवंत स्वरुपात पुन्हा उभी राहावीत याकरिता महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी एकत्र आले आहेत.

मुंबई महापालिका, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मदतीने विद्यार्थ्यांनी ही झाडे पुन्हा उभी करण्याचा प्रयत्न केला आहे. झाडांसाठी काम करत असलेले कामत, माजी विद्यार्थी रामनाथकर, जाधव  यांच्यासह महाविद्यालयाच्या प्राचार्यांची यासाठी मदत होत आहे. सर ज. जी स्कूल ऑफ आर्ट, सर ज. जी. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि सर ज. जी. इन्स्टियुट ऑफ अप्लाइड आर्टच्या माजी विद्यार्थ्यांसह संजय कामत आणि त्यांचे मित्र यासाठी एकत्र आले आहेत. सर ज. जी. आर्किटेक्चर कॉलेजचे कला संचालक व प्राचार्य मिश्रा, सर जे. जी. स्कूल ऑफ आर्टचे डीन साबळे आणि सर जे जी इन्स्टियुटचे डीन संतोष क्षीरसागर व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता अजय बापट यांची यासाठी मदत होता आहे. दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरात कोसळधारा सुरु असतानाच गुरुवारी सकाळी साडे आठ वाजेपर्यंत मुंबईत तब्बल ३६१ ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. यात शहरात २७४, पूर्व उपनगरात ४० आणि पश्चिम उपनगरात ४७ ठिकाणी झाडे कोसळली. मरिन लाइन्स व चर्नी रोडच्या दरम्यान रेल्वे रुळावर झाड पडले. त्यामुळे रेल्वेची वाहतूक काही काळ बंद होती. चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. तर मंबई सेंट्रल ते विरारपर्यंतची वाहतूक सुरळीत होती.

 

Web Title: The fallen trees come alive again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.