Join us

समुद्रातील खनिज तेलसाठ्यांच्या सर्व्हेमुळे मासेमारीला उतरती कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 3:33 AM

मच्छीमारांचा आरोप : चुकीच्या पद्धतीने काम सुरू असल्याचा फटका

मुंबई : मुंबईलगतच्या समुद्रामध्ये खनिज तेलसाठ्याच्या सर्व्हेक्षणामुळे मच्छिमार बांधवाना प्रवेश नाकारला जातो. त्यामुळे मासेमारी व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. मच्छीमारांचा ‘मासेमारी गोल्डन बेल्ट’ हा भाग खनिज तेलामध्ये सामाविष्ट झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. खनिज तेल कंपन्या या चुकीच्या पध्दतीने काम करत असल्याचा आरोप मच्छिमारांच्या संघटनेने केला आहे.

अरबी समुद्रात ९०० खनिज तेलाच्या विहिरी खोदण्यात आल्या आहेत. डहाणू, पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड इथपर्यंत मोठ्या प्रमाणात खनिज तेल सापडते. खनिज तेलाचा सर्व्हे करताना समुद्रात मोठा स्फोट केला जातो. या स्फोटाचा आवाज हा जेट इंजिनाच्या एक लाख पटीपेक्षा जास्त असतो. स्फोट घडून आणल्यानंतर तीन किलोमीटरच्या परिसरामध्ये माशांचे थर पडतात. यात डॉल्फिन आणि व्हेल सारख्या माशांचा समावेश असतो. त्यामुळे मच्छिमारांच्या व्यवसायांना उतरती कळा लागली आहे. मागील ४० वर्षांपासून मच्छिमारांना फंड मिळत नाही. मच्छिमारांचे भवितव्य अंधारात असल्याचे अखिल महाराष्ट्र मच्छीमार समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी सांगितले.सेसमीक सर्व्हेमुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये माशांची पैदास होत नाही. सेसमीक सर्व्हेमध्ये स्फोट केला जातोय. त्यामुळे या परिसरात मासेच शिल्लक राहत नाही. पूर्वी खनिज तेलाचा साधारण सर्व्हे केला जात होता. त्यावेळी साधारण सर्व्हेचा परिणाम हा मच्छीमार बांधवांना जाणवला नाही. आताच्या सर्व्हेविरोधात कोळीबांधवांनी मोर्चा काढला होता. खनिज तेल कंपनीने मच्छीमार बांधवांना विश्वासात न घेता सर्व्हे सुरूच ठेवला. त्या विरोधीत पालघर येथील जिल्हाधिकारी कार्यालय आणि सागरी मोर्चा काढण्यात आला. सागरी मोर्चामुळे सर्व स्तरावरील यंत्रणा कामाला लागली, असे महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघाचे अध्यक्ष रामदास संधे यांनी सांगितले. मच्छिमारांच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणीही होत आहे़मच्छीमारांच्या मागण्याप्रत्येक मच्छीमार खलाशाला १ लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी. ज्याची छोटी बोट आहे, त्याला १ लाख रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी. सहा सिलेंडरचे इंजिन असलेल्या बोटीला ६ लाख रूपये मिळाले पाहिजे, अशा मच्छीमार बांधवांच्या मागण्या आहेत.या भागात सर्व्हेमार्वेपासून ते दमण भागात सर्व्हे सुरू आहे. सर्व्हेसाठी जवळपास १०० किलोमीटरचा परिसर असावा. पूर्वी चार केबल असायच्या आता दहा केबलअसून ते हायड्रोलिक आहेत. त्यामुळे येथील मासे दुसरीकडे निघून गेले आहेत.

टॅग्स :मुंबईमच्छीमार