सोळाव्या मजल्यावरून परांची कोसळून तीन ठार; एक गंभीर जखमी, बोरीवलीमधील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 09:36 AM2024-03-13T09:36:21+5:302024-03-13T09:36:49+5:30

बोरीवली पश्चिमेकडील सोनीवाडी परिसरात ही दुर्घटना घडली.

falls from 16th floor died three one seriously injured incident in borivali | सोळाव्या मजल्यावरून परांची कोसळून तीन ठार; एक गंभीर जखमी, बोरीवलीमधील घटना 

सोळाव्या मजल्यावरून परांची कोसळून तीन ठार; एक गंभीर जखमी, बोरीवलीमधील घटना 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बोरीवलीतील कल्पना चावला चौकात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीची परांची कोसळून मंगळवारी झालेल्या दुर्घटनेत तीन जण ठार, तर आणखी एक जण जखमी झाला.

बोरीवली पश्चिमेकडील सोनीवाडी परिसरात ही दुर्घटना घडली. या परिसरात २४ मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीच्या भोवती कामगारांसाठी बांबूची परांची बांधण्यात आली होती. दुपारी १ च्या सुमारास अचानक सोळाव्या मजल्यावरून परांचीचा काही भाग कोसळला. त्यात चार जण जखमी झाले. या जखमींना कांदिवली  येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी तिघांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मनोरंजन समाज (४२), शंकर वैद्य (२५), पीयूष हरदार (३८) अशी मृतांची नावे आहेत. या दुर्घटनेत सुशील गुप्ता (३५)  गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान घटनेची पुढील चौकशी सुरू आहे.

बोरिवली पोलिसांनी सोनी आर्केड इमारत साईटचा कंत्राटदार सरोजकुमार चक्रपाणी सल्ला (वय ३५), साईट इंजिनिअर  धनंजय विजय परब (वय २९) आणि फोरमन राहुल ऊर्फ लिटन बादल बियस्वास (वय ३५) या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

सोनी अरकेड या इमारतीच्या १७ व्या मजल्यावर काम करत असताना वरून खाली पडल्याप्रकरणी आम्ही अकस्मात मृत्यूची नोंद केली असून त्यासाठी जबाबदार असणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. - निनाद सावंत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बोरिवली पोलिस ठाणे.

 

Web Title: falls from 16th floor died three one seriously injured incident in borivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.