Join us

खोटे आश्वासन पडले महागात

By admin | Published: January 29, 2017 1:26 AM

‘लेझर लायपो लायसिस’ ट्रीटमेंटच्या सहाय्याने वजन कमी करण्याचे आश्वासन देऊन हुलकावण्या देणाऱ्या अंधेरी येथील ‘गॉर्जेस स्कीन प्रा. लि’ला ग्राहक तक्रार निवारण

मुंबई : ‘लेझर लायपो लायसिस’ ट्रीटमेंटच्या सहाय्याने वजन कमी करण्याचे आश्वासन देऊन हुलकावण्या देणाऱ्या अंधेरी येथील ‘गॉर्जेस स्कीन प्रा. लि’ला ग्राहक तक्रार निवारण मंचाने दणका दिला आहे. उपचारासाठी भरलेली मूळ रक्कम १५ टक्के व्याजाने व मानसिक त्रासापोटी एकूण ५७,२०० रुपये देण्याचे आदेश ग्राहक मंचाने कंपनीला दिले आहेत. काश्मीरा घरत यांनी ‘गॉर्जेस स्कीन’ची वजन करण्यासंदर्भातील जाहिरात एका वर्तमानपत्रात वाचली. त्यानुसार, त्यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधत, १ जून २०११ रोजी ट्रीटमेंटसाठी ३९ हजार ३०० रुपयांचा चेकही भरला. मात्र, बराच काळ उलटूनही उपचार करण्यात आले नाहीत. उपचार करण्यात येत नसल्याने काश्मीरा यांनी कंपनीला त्यांचे पैसे परत करण्यास सांगितले. मात्र, त्यांना पैसेही परत करण्यात आले नाहीत. काश्मीरा यांनी कंपनीच्या संचालक पूर्णिमा म्हात्रे यांच्याविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी त्यांना उपस्थित राहण्यास सांगितले, तरीही म्हात्रे उपस्थित राहिल्या नाहीत. अखेरीस काश्मीरा यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार केली. ग्राहक मंचाने मानसिक त्रासापोटी १० हजार रुपये, तर तक्रारीचा खर्च म्हणून ७ हजार ५०० रुपये द्यावेत, असा आदेश कंपनीला दिला. (प्रतिनिधी)