दर्ग्यात दहशतवादी शिरल्याचा खोटा कॉल, गुन्हा दाखल; डोंगरी पोलिसांकडून तपास सुरू

By मनीषा म्हात्रे | Published: February 15, 2024 11:06 AM2024-02-15T11:06:15+5:302024-02-15T11:06:40+5:30

तक्रारीनुसार, बुधवारी सकाळी साडे अकरा ते अडीच च्या सुमारास एका व्यक्तीने केला.

False call of terrorists entering Dargah; A case has been registered, investigation is underway by the dongri police | दर्ग्यात दहशतवादी शिरल्याचा खोटा कॉल, गुन्हा दाखल; डोंगरी पोलिसांकडून तपास सुरू

दर्ग्यात दहशतवादी शिरल्याचा खोटा कॉल, गुन्हा दाखल; डोंगरी पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : दर्ग्यात दहशतवादी शिरल्याचा खोटा कॉल करणाऱ्या विरुद्ध डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंकुश राणबा साबणे (५५) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. 

तक्रारीनुसार, बुधवारी सकाळी साडे अकरा ते अडीच च्या सुमारास एका व्यक्तीने केला. कॉलरच्या मते काही पुरुष व महिला आंतंगवादी दर्गा मध्ये घुसले असून त्यांच्या हातामध्ये रायफल आहे. पोलीस मदत हवी आहे". असे सांगितले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपासणी केली. मात्र त्यात काहीही आढळून आले नाही. प्राथमिक तपासात आरोपीने सार्वजनिक शांतता बिघडवून जनतेमध्ये भिती निर्माण करण्याच्या उद्देशाने तसेच इतर नागरिकांना पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या सुरक्षात्मक उपाययोजनेमुळे त्रास व्हावा या उद्देशाने, त्याने खोटी माहिती दिल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारनळ येथील टेलिफोन बूथ वरून हा कॉल केल्याचे समोर आले. मात्र परिसरात सीसीटिव्ही उपलब्ध नसल्याने आरोपी पर्यंत पोहचण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे. दिवसभर किती जणांनी याठीकानाहून कॉल केले? याबाबत पोलीस चौकशी करत आहे. 

Web Title: False call of terrorists entering Dargah; A case has been registered, investigation is underway by the dongri police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.