लोअर परळमध्ये बनावट आॅनलाइन लॉटरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 02:41 AM2018-04-20T02:41:12+5:302018-04-20T02:41:12+5:30
लोअर परळ येथील केवळ इंडस्ट्रीज इस्टेटमधून संघटितरीत्या आॅनलाइन व मोबाइलद्वारे बनावट आॅनलाइन लॉटरीचा धंदा सुरू आहे. राज्यभरात सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यामुळे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याचा आरोप शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेने केला आहे.
मुंबई : लोअर परळ येथील केवळ इंडस्ट्रीज इस्टेटमधून संघटितरीत्या आॅनलाइन व मोबाइलद्वारे बनावट आॅनलाइन लॉटरीचा धंदा सुरू आहे. राज्यभरात सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यामुळे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याचा आरोप शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेने केला आहे. पोलिसांनी या ठिकाणी कारवाई केली नाही, तर शिवसेना स्टाईलने कंपनींना उत्तर देण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष मनोज वारंग यांनी दिला आहे.
वारंग म्हणाले की, आॅनलाइन लॉटरीवर २८ टक्के जीएसटी आकारण्यात आला आहे. मात्र लोअर परळच्या केवळ इंडस्ट्रीजमध्ये गेल्या काही वर्षांपासून राजरोसपणे स्वत:चे सॉफ्टवेअर वापरून बेकायदेशीर धंदा सुरू आहे. पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने या ठिकाणाहून राज्यभरात बेकायदेशीर लॉटरीचा धंदा चालवला जात आहे. याशिवाय मालवणी आणि चारकोपमध्येही याचप्रकारे जुगार सुरू असल्याचे दिसते. त्याचा फटका प्रामाणिकपणे धंदा करणाऱ्या लॉटरी विक्रेत्यांना बसत आहे.
परिणामी, लोअर परळमध्ये पोलिसांकडून या बेकायदेशीर धंद्याला अभय दिले जात असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.