पैसे घेऊन मत न विकण्याचे मतदारांना ‘फॅम’चे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 05:09 AM2018-12-07T05:09:04+5:302018-12-07T05:09:10+5:30

मतदानाद्वारे प्रत्येक नागरिक आपला प्रतिनिधी निवडतो आणि संसदेत पाठवतो. मतदानावरच नागरिकांचे, पर्यायाने देशाचे भवितव्य अवलंबून आहे.

'FAM' appealed to voters to not buy votes | पैसे घेऊन मत न विकण्याचे मतदारांना ‘फॅम’चे आवाहन

पैसे घेऊन मत न विकण्याचे मतदारांना ‘फॅम’चे आवाहन

Next

मुंबई : मतदानाद्वारे प्रत्येक नागरिक आपला प्रतिनिधी निवडतो आणि संसदेत पाठवतो. मतदानावरच नागरिकांचे, पर्यायाने देशाचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे ‘फेस आॅफ आंबेडकराइट्स मुव्हमेंट’ म्हणजेच ‘फॅम’ या संघटनेने येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘मतदान जनजागृती अभियान’ हाती घेतले आहे.
या अभियानांतर्गत मतदानावेळी पैसे घेऊन आपला स्वाभिमान विकून मत देऊ नका. जो तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण करून तुमचा सर्वांगीण विकास करेल, अशाच उमेदवाराला मत द्या, असे आवाहन फॅमने केले आहे.

 

Web Title: 'FAM' appealed to voters to not buy votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.