वांद्र्यात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2018 05:48 PM2018-06-23T17:48:09+5:302018-06-23T17:48:16+5:30
कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचं घरात सापडलेल्या चिठ्ठीतून उघड
मुंबई: वांद्रे पूर्वेतील खेरवाडी परिसरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली आहे. राजेश भिंगारे, त्यांची पत्नी आणि दोन मुलांनी विष प्राशन करून आयुषय संपवलं. कर्जाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून समोर आली आहे. भिंगारे हे रेशनिंग कार्यालयात कार्यरत होते. या घटनेची माहिती मिळताच खेरवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे.
राजेश भिंगारे कुटुंबासह वांद्रे पूर्वेतील खेरवाडी येथील शासकीय वसाहतीत वास्तव्याला होते. गरिबी आणि त्यामुळे आलेल्या तणावातून आत्महत्या करत असल्याचं त्यांनी चिठ्ठीत लिहिलं आहे. राजेश यांनी पत्नीसह मुलगा तुषार (वय 23 वर्षे) आणि गौरांग (वय 29 वर्षे) यांच्यासह विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. या चौघांना सायन रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.