कौटुंबिक वादातून मुलाने केली वृद्ध आईची हत्या

By admin | Published: February 1, 2016 02:48 AM2016-02-01T02:48:02+5:302016-02-01T02:48:02+5:30

दादर येथील उच्चभ्रू वसाहतीमधील गोपाळधाम इमारतीत ३७ वर्षीय मुलाने वृद्ध आईची धोपटण्याने घाव घालून निर्घृण हत्या केल्याची घटना रविवारी घडली

The family has raised an old mother's murder | कौटुंबिक वादातून मुलाने केली वृद्ध आईची हत्या

कौटुंबिक वादातून मुलाने केली वृद्ध आईची हत्या

Next

मुंबई : दादर येथील उच्चभ्रू वसाहतीमधील गोपाळधाम इमारतीत ३७ वर्षीय मुलाने वृद्ध आईची धोपटण्याने घाव घालून निर्घृण हत्या केल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी आरोपी तेजस रमेश तन्वी याला पकडले आहे.
दादर पश्चिमेकडील अ‍ॅस्लेन रोड येथील गोपाळधाम इमारतीच्या पहिल्या मजल्यावर तन्वी कुटुंब राहतात. पतीच्या निधनानंतर ६७ वर्षीय रेखा रमेश तन्वी या तेजससोबत राहत होत्या. त्याच परिसरात त्यांचे कपड्याचे दुकान आहे. तेजसची मानसिक प्रकृती ठीक नसल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले आहे. शिवाय गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वादातून त्यांच्यामध्ये खटके उडत असल्याचेही शेजाऱ्यांनी सांगितले.
अशा परिस्थितीत शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला. आणि रागाच्या भरात तेजसने कपडे धुण्याच्या धोपटण्याने आईवर घाव केले. रेखा यांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत शेजारीही दरवाजापर्यंत येऊन थडकले. मात्र रक्ताच्या थारोळ््यात पडलेल्या रेखावर तेजस एकामागून एक वार करतच होता. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने रेखा यांची मदत करण्यास शेजाऱ्यांना शक्य झाले नाही. वारंवार विनंती करुन देखील तो दरवाजा उघडत नव्हता. अखेर शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश मिळवला,मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
घटनेची माहिती मिळताच शिवाजी पार्क पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेजसला ताब्यात घेत पोलिसांनी रेखा यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. त्याठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आले. प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून ही हत्या झाली असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी तेजसला रात्री उशिराने हत्येच्या गुन्ह्यात अटक केली. खुनाचा अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलीस उपायुक्त महेश पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)

Web Title: The family has raised an old mother's murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.