Join us

खानदानी ऐश्वर्याचे आॅपेरा हाउस

By admin | Published: October 23, 2016 3:06 AM

मुंबईच्या मनोरंजनाच्या दुनियेतली शान असलेल्या या खानदानी थिएटरचा थाट पूर्वा काही औरच असायचा. आॅपेरा हाउसच्या आतल्या ऐश्वर्याचे दर्शन घडताना, त्याच्या रचनेत बरोक

- श्रीराम खाडिलकरमुंबईच्या मनोरंजनाच्या दुनियेतली शान असलेल्या या खानदानी थिएटरचा थाट पूर्वा काही औरच असायचा. आॅपेरा हाउसच्या आतल्या ऐश्वर्याचे दर्शन घडताना, त्याच्या रचनेत बरोक शैलीचा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. याच्या घुमटात छताच्या दिशेने काही युरोपीयन नामांकित कवी, साहित्यिक, नाटककार, संगीतकार, वादक यांची व्यक्तिचित्रे रंगवलेली होती. तिथले दगडातले सुंदर शिल्पाकार, वायोलिन आणि हार्प वाजवणाऱ्या स्त्रियांची दगडातली आकर्षक शिल्पे, तसेच बाहेरूनही श्रीमंती थाट जाणवणारी...एक काळ गाजवलेले आणि दोन दशके बंद असलेले दक्षिण मुंबईतले प्रसिद्ध 'आॅपेरा हाउस'ने एक काळ खूप गाजवला होता. त्याच्या भिंती अनेक मान्यवर गायक, वादक, संगीतकारांच्या सुरांचा आनंद घेऊन, तसेच अनेक सिल्व्हर ज्युबिली चित्रपटांच्या प्रदर्शनांमुळे समृद्ध झाल्या आहेत. तो खानदानी आनंद आता पुन्हा अनुभवता येणार आहे.अत्यंत दर्जेदार चित्रपटांचे माहेरघर अशी ओळख असलेले आॅपेरा हाऊस पुन्हा एकदा रसिकांच्या स्वागतासाठी खुले होणे ही चित्रपट जगतासाठी फार मोठी गोष्ट आहे. १९११ मध्ये बांधून तयार झालेल्या या आॅपेरा हाऊसमध्ये सुरूवातीच्या काळात आॅपेरा होत असत. नंतरच्या काळात संगीताचे अनेक जलसे इथे झाले तसेच बालगंधर्वांचे तसेच दीनानाथ मंगेशकरांचेही गाणे याच ठिकाणी रसिकांनी ऐकले. त्याचबरोबर पारशी आणि गुजराथी नाटकांचे प्रयोगही इथे होत असत. पृथ्वीराज कपूरच काय पण, राज कपूर, शम्मी कपूर आणि शशी कपूर यांनीही आॅपेरा हाऊसच्याच रंगमंचावर नाटकात कामे केली. या थिएटरमधली आणखी एक महत्वाची इथली घटना म्हणजे लता मंगेशकर यांचे पहीले जाहीर गाणे याच ठिकाणी झाले. १९३५ मध्ये आॅपेरा हाऊसचे चित्रपटगृहात रूपांतर करण्यात आले आणि रूपेरी पडद्याची रंगत इथ ेपेश हाऊ लागली. असे असले तरीही रविवारी सकाळी या ठिकाणी अगदी १९९१ पर्यंत गाण्यांच्या तसेच अन्य कार्यक्र मांसाठी दिले जात होते. सुमार दर्जाचे चित्रपट आॅपेरा हाऊसमध्ये कधीच लागले नाहीत. त्यामुळे प्रेक्षकही नेहमीच चांगला असायचा. कुटूंबाने एकत्र जाऊन निर्धोकपणे चित्रपट पाहता येण्याची ही उत्तम सोय होती. दर्जेदार चित्रपटांचे आणि सुसंस्कृत प्रेक्षकाचे माहेरघर अशी आॅपेरा हाऊसची ओळख होती. वितरकांसाठी पूर्वी चित्रपटाचा ट्रायल शो व्हायचा तेव्हा दर्जेदार आणि अभिरूचिसंपन्न चित्रपट असला तर लगेचच ह्यक्या यह फिल्म आॅपेरा हाऊस में चलनेवाली हैह्ण असे वितरक बोलून दाखवत असत. आॅपेरा हाऊसला एकदा चित्रपट लागला की तो पंचवीस आठवडे चालेल अशी खात्री जवळपास प्रत्येकालाच असायची आण िप्रत्यक्षातही चित्रपट तेवढा चालायचासुध्दा. १९५९ मध्ये आलेल्या शांतारामबापूंच्या ’नवरंग‘‘ या चित्रपटाचा रौप्यमहोत्सव जसा इथे झाला तसाच १९७० मध्ये आलेल्या मनोज कुमारच्या ’पूरब और पश्चिम‘‘या चित्रपटाचा आणि अमतिाभच्या सिलसिला याही चित्रपटाचे रौप्यमहोत्सव इथेच झाले. एवढेच काय पण सुनील दत्त आणि नूतन यांच्या भूमिका असलेला बिमल राय यांचे दिग्दर्शन असलेला ’सुजाता‘‘ हा चित्रपटही यां थिएटरमध्ये रौप्यमहोत्सवी यश मिवत होता... ज्युबिली झालेल्या अशा अनेक चित्रपटांची नावे सांगता येतील. आॅपेरा हाऊस ही मुंबईतली एकेकाळी चक्क ओपन एअर आर्ट गॅलरी होती. आतल्या दर्जेदार सिनेमांप्रमाणेच बाहेरचे डेकोरेशनही दर्जेदारच असायचे. या थिएटरवरील सिनेमाचे बॅनर्स, कटाऊटस तसेच अन्य कल्पक डेकोरेशन पहायला पूर्वा एकच गर्दी व्हायची. आर्ट स्कूलमध्ये प्रवेश न मिळालेले मुंबईतले तमाम चित्रकार दर शुक्र वारी दुपारी बारा वाजल्यापासून डेकोरेशन पाहायला आॅपेरा हाऊसच्या बाहेर थिएटर डेकोरेशन पाहायला एकच गर्दी करत असत. ही गर्दी तिथे लावलेले भव्य आकाराचे बॅनर्स, मोठया आकाराच्या फोटो फ्रेम, थ्री डायमेन्शनल कटआऊटस, पाहत असत. तिथे बॅनर्सच्याचबरोबर प्लेन लाईटस्, कलरफूल लाईटस्, रिनंग लाईटस् इतकेच नाही तर आरती करणारी हिरॉईन किंवा कृष्ण जन्म असे प्रसंग हालत्या चित्रांच्या माध्यमातूनही पाहायला मिळत असत. रंगवलेल्या बॅनर्सबरोबर असे डेकोरेशन संध्याकाळी पाहणे हे खास आकर्षण असायचे. विशेष म्हणजे चित्रपट भरपूर आठवडे चालणार अशी खात्री असल्याने बॅनर आर्टिस्टस्ही या डेकोरेशनवरही खूप मेहनत घ्यायचे. हे डेकोरेशन अनेकदा शहरातला चर्चेचा विषय होत असे. त्यामुळे चित्रपटाचीही प्रसिद्धी छान होत होती. याचाच फायदा घेऊन आॅपेरा हाऊसचे डेकोरेशन पाहायला आलेल्यांच्या नजरेला आपल्याही सिनेमाची नावे पडावीत अशा सूप्त इच्छेपोटी तेथे जवळच असलेल्या आॅटॉमोबाईलच्या सुटया भागांची दुकाने असलेल्या रस्त्यावर आगामी चित्रपटांचे बॅनर्स मुद्दाम लावले जात असत. आॅपेरा हाऊसचा असाही फायदा होत असे. ही वास्तू गोंडलच्या महाराजांच्या मालकीची आहे. हे थिएटर परत एकदा मुंबईच्या सांस्कृतिक घडामोडींचे केंद्र बनावे असे या महाराजांचे स्वप्न आहे. काळाबरोबर पाऊले टाकून हा बदल झालाय आणि मुंबईकरांच्या सेवेत आॅपेरा हाऊस रूजू होण्याची ही मनोरंजनाच्या क्षेत्रातली घटनाही नक्कीच ऐतिहासिक म्हणावी लागेल.