Lata Mangeshkar : लतादीदींच्या स्मारकासाठी कुटुंबाने मार्गदर्शन करावे; अमित देशमुख यांची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 07:35 AM2022-02-25T07:35:54+5:302022-02-25T07:36:12+5:30

Lata Mangeshkar : देशमुख यांनी गुरूवारी मंगेशकर कुटुंबीयांची घरी जाऊन सांत्वना भेट घेतली.

Family should guide for lata mangeshkar memorial Request from minister Amit Deshmukh | Lata Mangeshkar : लतादीदींच्या स्मारकासाठी कुटुंबाने मार्गदर्शन करावे; अमित देशमुख यांची विनंती

Lata Mangeshkar : लतादीदींच्या स्मारकासाठी कुटुंबाने मार्गदर्शन करावे; अमित देशमुख यांची विनंती

Next

मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांचे गायन व त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्वच अलौकिक होते. त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे  स्मारक राज्य सरकारतर्फे उभारण्यासाठी मंगेशकर कुटुंबीयांनी मार्गदर्शन करावे, अशी विनंती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केली. देशमुख यांनी गुरूवारी मंगेशकर कुटुंबीयांची घरी जाऊन सांत्वना भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लता दीदींच्या धाकट्या भगिनी उषा मंगेशकर, बंधू हृदयनाथ मंगेशकर, माजी आमदार उल्हास पवार, संगीतकार मयूरेश पै उपस्थित होते.

लतादीदींच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी उत्कृष्ट असे संगीत संग्रहालय सरकारला उभारता येईल, असे सांगून देशमुख यांनी याबाबत मंगेशकर कुटुंबीयांचा मानस जाणून घेतला. याबाबतच्या सूचना कुटुंबीयांकडून सरकारला पत्राद्वारे कळविण्यात येतील, असे हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितले. 

सुमारे ४० वर्षांपूर्वी लातूरमध्ये एका महाविद्यालयाला मा. दीनानाथ मंगेशकर यांचे नाव  देण्याची लातूरकरांची विनंती  दीदींनी मान्य केली होती, अशी आठवण सांगत देशमुख  यांनी लतादीदींच्या लातूरशी निगडित आठवणी जागवल्या. 

Web Title: Family should guide for lata mangeshkar memorial Request from minister Amit Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.