Join us

'शोले'तील 'सूरमा भोपाली' प्रसिद्ध कॉमेडियन जगदीप यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 10:34 PM

Jagdeep Passes Away जगदीप यांचा जन्म. २९ मार्च १९३९ रोजी मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात झाला होता. सैयद इश्तियाक अहमद जाफरी हे मा.जगदीप यांचे खरे नाव.

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध कॉमेडियन जगदीप (सैयद इश्तियाक अहमद जाफरी ) यांचे मुंबईमध्ये वृद्धापकाळाने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. 

जगदीप यांचा जन्म. २९ मार्च १९३९ रोजी मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात झाला होता. सैयद इश्तियाक अहमद जाफरी हे जगदीप यांचे खरे नाव. जगदीप अभिनयास सुरुवात बाल कलाकार म्हणुन बी.आर. चोप्रा यांच्या अफसाना या चित्रपटाने केली. बाल कलाकार म्हणून त्यांचे इतर चित्रपट अब दिल्ली दूर नही, मुन्ना व हम पंछी एक डाल के. त्यानंतर बिमल रॉय यांच्या दो बीघा जमीन या चित्रपटाद्वारे विनोदी भूमिकेस सुरूवात केली. त्यांनी ३०० हून अधिक सिनेमांमध्ये काम करून आपल्या अभिनयाची मजबूत छाप सोडली.

 'शोले' सिनेमातील त्यांच्या भूमिकेमुळे ते खूप प्रसिद्ध झाले. त्या सिनेमामुळे त्यांना सूरमा भोपाली म्हणून ओळखण्यात आले. हे नाव इतके प्रसिद्ध झाले की, त्यांनी या नावाने एका सिनेमाचे दिग्दर्शन देखील केले. आपल्या हाव भावाने दर्शकांना हसविणाऱ्या जगदीश यांच्या भूमिकेचा अंदाज खूप वेगळाच होता.  जगदीप यांनी मच्छर इन पुराना मंदीर, अंदाज अपना अपना, फिर वही रात, कुरबानी, शहनशाह यांसारख्या सिनेमांत काम केले आहे. मा.जगदीप यांनी हिंदी सिनेमात अनेक विनोदी भूमिका केल्या आहेत. त्यांनी निर्माण केलेल्या एकमात्र चित्रपटाचे नाव सुरमा भोपाली होते. अभिनेता जावेद जाफरी हे त्यांचे पुत्र आहेत. त्यांचा दुसरा पुत्र नावेद जाफरी आहे. नावेद व जावेद जाफरी यांनी टी.वी. वर प्रसिद्ध नृत्य मालिका बुगी वुगी निर्माण केली आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

सैन्याचा हाय अलर्ट! Facebook, Truecaller, Instagram तातडीने डिलीट करा; जवानांना आदेश

Breaking: प्रवीण दरेकर यांच्या वाहनाला अपघात; पोलीस व्हॅनची धडक

मुंबईकडून मोठा दिलासा! कोरोना रुग्ण दुपटीचा दर ४५ दिवसांवर

राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढू लागला; मुंबईतील मृतांचा आकडा 5000 पार

शिवभोजन थाळी पुढचे तीन महिने 5 रुपयांनाच; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय

ही तर कोरोनाची पहिली लाट, जगाला मोठी किंमत मोजावी लागणार; चीनची धमकी

पारनेरच्या पाच नगरसेवकांना अजित पवारांनी अखेर मिलिंद नार्वेकरांकडे सोपविले

टॅग्स :बॉलिवूडजावेद जाफरी