Join us

प्रसिद्ध दिग्दर्शक जे. ओम प्रकाश यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 2:49 AM

राकेश रोशन यांचे सासरे, हृतिक रोशन याचे आजोबा आणि प्रख्यात दिग्दर्शक निर्माते जे. ओम प्रकाश यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले.

मुंबई : राकेश रोशन यांचे सासरे, हृतिक रोशन याचे आजोबा आणि प्रख्यात दिग्दर्शक निर्माते जे. ओम प्रकाश यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. हृतिकची आई पिंकी रोशन यांचे ते वडील होते. ‘आखिर क्यूँ’ आणि ‘आप की कसम’ हे त्यांचे गाजलेले सिनेमे. १९७४ मध्ये ‘आप की कसम’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा. ‘अफसाना दिलवालों का’, ‘आदमी खिलौना है’, ‘आदमी और अफसाना’, ‘भगवान दादा’, ‘आस पास’ असे अनेक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. त्याआधी निर्माते अशी त्यांचीओळख होती. १९६१ साली ‘आस का पंछी’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली.१९७५ मध्ये प्रदर्शित झालेला आणि तुफान गाजलेला ‘आँधी’ हा चित्रपटही त्यांनीच प्रोड्यूस केला. ‘आप की कसम’, ‘भगवान दादा’, ‘आदमी खिलौना है’, ‘अपनापन’, ‘गेट वे आॅफ इंडिया’ अशा अनेक चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली होती.