मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा नवा लोगो प्रसिद्ध

By admin | Published: July 7, 2015 02:50 AM2015-07-07T02:50:36+5:302015-07-07T02:50:36+5:30

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो - ३ मार्गाची अंमलबजावणी करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा नवा लोगो सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला.

The famous Mumbai Metro Rail Corporation's new logo is famous | मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा नवा लोगो प्रसिद्ध

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा नवा लोगो प्रसिद्ध

Next

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो - ३ मार्गाची अंमलबजावणी करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा नवा लोगो सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला. तसेच यापूर्वी राज्य सरकारची कंपनी असलेली मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन राज्य आणि केंद्र सरकारच्या विद्यमाने सुरू राहणार आहे.
यापूर्वीचा लोगो मेट्रो - ३ उन्नत मार्गासाठी बनविण्यात आला होता. मात्र, नवीन लोगो योग्य स्वरूपात आणि अधिक स्पष्ट आणि उठावदार असेल, असे कॉर्पोरेशनचे संचालक आणि एमएमआरडीएचे आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी लोगो सादर करताना सांगितले. मुंबईतील वाहतूक व्यवस्था सोडविण्यासाठी आणि उपनगरीय रेल्वेमधील गर्दीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी भुयारी मेट्रोची आवश्यकता आहे. याच अनुषंगाने आम्ही शहराशी नव्याने संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत, असे एम.एम.आर.सी.च्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी सांगितले. या वेळी केंद्रीय नगर विकास विभागाचे अवर सचिव अंबुज वाजपेयी यांच्यासह एमएमआरसीचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: The famous Mumbai Metro Rail Corporation's new logo is famous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.