प्रसिद्ध छायाचित्रकार जगदीश औरंगाबादकर यांची आत्महत्या

By Admin | Published: October 14, 2016 03:18 AM2016-10-14T03:18:33+5:302016-10-14T03:18:33+5:30

प्रसिद्ध छायाचित्रकार जगदीश औरंगाबादकर यांनी गोरेगावमधील त्यांच्या राहत्या घरात आत्महत्या केली. त्यांचे वय ७० होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी

Famous photographer Jagdish Aurangabadkar suicides | प्रसिद्ध छायाचित्रकार जगदीश औरंगाबादकर यांची आत्महत्या

प्रसिद्ध छायाचित्रकार जगदीश औरंगाबादकर यांची आत्महत्या

googlenewsNext

मुंबई : प्रसिद्ध छायाचित्रकार जगदीश औरंगाबादकर यांनी गोरेगावमधील त्यांच्या राहत्या घरात आत्महत्या केली. त्यांचे वय ७० होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. गुरुवारी सायंकाळी ओशिवरा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


मला मदत करणाऱ्या माझ्या सर्व सहकारी मित्रांचे मी आभार मानतो.. माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये, अशी सुसाईड नोट लिहून ठेवत औरंगाबादकर यांनी आपले जीवन संपविले. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या मित्रांचे आभार मानत, आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये असे नमुद केल्याचे पोलिसांनी सांगितले.
जगदीश औरंगाबादकर हे समाजवादी विचारसरणीचे होते. समाजवादी आणि जनता पार्टीमध्ये ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्यासह सक्रीय होते. तसेच, त्यांनी १९७८ साली जनता पार्टीशी बंडखोरी करत महापालिकेची निवडणूक लढविली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Famous photographer Jagdish Aurangabadkar suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.