मुंबई : ‘बहनो और भाईयों आप सुन रहे है बिनाका गीतमाला रेडिओ सिलोनपर...’ असे म्हणत श्रोत्यांना आपल्या मखमली आवाजाने कानसेन बनविणारे, रेडिओच्या सुवर्ण युगाचे साक्षीदारही आणि कर्तेही, ज्येष्ठ सूत्रसंचालक व उद्घोषक अमीन सयानी (९१) यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सयानी यांच्या पश्चात मुलगा राजील आणि इतर परिवार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. २१ डिसेंबर १९३२ रोजी मुंबईत जन्मलेले अमीन सयानी आवाजाचे जादूगार होते.
विविध पुरस्कारांनी झाला सन्मान
सयानी यांनी५० हजारांहून अधिक रेडिओ कार्यक्रमांची निर्मिती आणि त्यांना व्हाॅइसओव्हर देण्याचे कामही अमीन यांनी केले.
त्यांना इंडियन सोसायटी ऑफ ॲडव्हर्टाइजमेंटतर्फे गोल्ड मेडल, लिम्का बुक ऑफ रेकाॅर्ड्सतर्फे पर्सन ऑफ द ईअर अवाॅर्डसह अनेक सन्मान मिळाले.