मुंबई - थलायवा रजनीकांत यांचा वादग्रस्त आणि बहुप्रतीक्षित सिनेमा 'काला' बुधवारच्या (6 जून) नाट्यमय घडामोडींनंतर अखेर बॉक्सऑफिसवर झळकला आहे. सिनेमावरुन निर्माण झालेल्या वादानंतरही प्रेक्षकांमध्ये सिनेमाबाबत प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. बुधवारी (6 जून) दुपारी 4 वाजता सिनेमाचा पहिला शो ठेवण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमा रिलीज होण्याच्या दोन दिवसांपूर्वीच सर्व शो हाऊसफुल्ल झालेत. दरम्यान, 'काला' रिलीज होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर केरळमधील एका आयटी कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टीदेखील दिली.
(काय करणार तलैवा? भाजपात जाणार की भाजपापासून दूर?)
'काला'च्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्यास नकार के.एस. राजशेखरन यांनी काला सिनेमाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्यास सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, सुप्रीम कोर्टानं यास नकार दिला आहे. याचिकाकर्त्यानं 'काला' सिनेमातील गाणी आणि काही दृश्यांवर आक्षेप नोंदवला आहे. सुनावणीदरम्यान कोर्टानं सांगितले की, तुम्ही सिनेमाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्याची मागणी करत आहात, मात्र प्रत्येक सिनेरसिक सिनेमा पाहण्यास आतुर आहे.