ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - उत्तर प्रदेशचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्यावर केलेली टीका बॉलीवुडमधील प्रसीद्ध कोरिओग्राफर फराह खानचे पती शिरीष कुंदन यांना महागात पडू शकते. लखनऊच्या हजरतगंजमध्ये शिरीषविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर शिरीषने आदित्यनाथ यांच्याविरोधात ट्विट केलं होतं. आदित्यनाथ गुंड असल्याची टीका त्यांनी केली होती, त्यानंतर ते ट्वीट त्यांनी डिलीट केलं.
'एखाद्या गुंडाला मुख्यमंत्री बनवणं म्हणजे दाऊद इब्राहिमला सीबीआयचं संचालक आणि विजय माल्ल्याला रिझर्व बॅंक ऑफ इंडियाचा गव्हर्नर बनवण्यासारखं आहे', असं ट्विट केलं होतं. तर दुस-या एका ट्विटमध्ये 'गुंडाला मुख्यमंत्री बनवून दंगली थांबतील असा विचार करणं म्हणजे बलात्का-याला बलात्काराची परवानगी देऊन त्याला बलात्कार रोखण्यास सांगण्यासारखं आहे', असं म्हटलं होतं.
त्यांच्या या ट्विटनंतर चांगलाच वाद उफाळला होता. वाद वाढत असल्याचं पाहून त्यांनी ट्विट डिलीट केलं. त्यानंतर एफआयआर दाखल झाल्याचं समजल्यावर शिरीषने ट्विट करून बिनशर्त माफी मागीतली आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता असं ट्वीट त्याने रात्री उशीरा केलं.
I unconditionally apologise. I never meant to hurt anyones feelings or sentiment.— Shirish Kunder (@ShirishKunder) March 24, 2017
UP: FIR registered in Hazratganj against filmmaker and Farah Khan's husband Shirish Kunder for his tweet against UP CM Yogi Adityanath. pic.twitter.com/X2Kgmds3u3
— ANI UP (@ANINewsUP) March 24, 2017