Join us

कचऱ्यातून उभारलेल्या फार्म हाउसचे ‘बिग बीं’नी केले कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 4:49 AM

महानगरपालिकेच्या विविध उपाययोजनांमुळे पूर्वी मुंबईत तयार होणाºया आठ हजार ते साडेआठ हजार टन कचºयाचे प्रमाण

मनोहर कुंभेजकर  मुंबई : महानगरपालिकेच्या विविध उपाययोजनांमुळे पूर्वी मुंबईत तयार होणाºया आठ हजार ते साडेआठ हजार टन कचºयाचे प्रमाण सध्या सरासरी ७ हजार २०० टनांवर आले आहे. या कचºयाचे ओला कचरा व सुका कचरा असे वर्गीकरण करत तयार झालेल्या गांडुळशेतीचा उपयोग करून, पश्चिम उपनगरातील विलेपार्ले पश्चिम येथील मुंबई महानगरपालिकेच्या कूपर हॉस्पिटलमध्ये सुमारे १ हजार ५०० चौरस मीटर जागेत चक्क हिरवेगार फार्महाउस उभे राहिले आहे.स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचे प्रमुख समन्वय अधिकारी सुभाष दळवी यांच्या संकल्पनेतून येथे नंदनवन फुलले आहे. बचतगटातील महिला, रुग्णालयातील कर्मचाºयांच्या सहकार्याने या जागेचा कायापालट झाला असून, सुंदर फार्महाउस येथे साकारले आहे. एका चित्रवाहिनीच्या कार्यक्रमासाठी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी या प्रकल्पाला शुक्रवारी सकाळी भेट देऊन या प्रकल्पाचे कौतुक केले. बिग बी हे स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आहेत. स्वच्छ भारत अभियान ही गरज आहे, म्हणून मी यामध्ये भाग घेतो आणि समाजासाठीदेखील हे अभियान गरजेचे असल्याचे बच्चन यांनी आपल्या टिष्ट्वटमध्ये नमूद केले आहे.सुभाष दळवी यांनी अमिताभ यांना हा प्रकल्प समजावून देताना सांगितले की, स्मार्ट व्हर्मिकमपोस्ट सिस्टीम आणि आॅरगॅनिक फार्मिंगद्वारे कूपर हॉस्पिटलच्या उपाहारगृहामधून रोज जमा होणाºया कचºयातून सुमारे सात ते नऊ किलो आणि महिन्याला सरासरी दोनशे किलो खत मिळते. या खताचा उपयोग करून, येथे फळाफुलांचा मळा फुलला आहे. केळीचा घड, पेरू, ताजी वांगी, मोठा भोपळा, रताळी, काजूची बोंड अशी फळे-भाज्यासह फळफुलांसह तमालपत्र, मिरे, दालचिनीसारख्या मसाल्याची सुमारे दोनशे झाडे आहेत. श्रीआस्था बचतगटातील महिलांनी आणि येथील कर्मचाºयांनी या खताचा वापर करून येथे हिरवागार मळा फुलविला.येथे एका जागेत मोठा पाच फूट रुंद असा खड्डा तयार करण्यात आला असून, यात हॉस्पिटलच्या उपाहारगृहामधून दररोज जमा होणारा १५० किलो ओला कचरा टाकण्यात येतो आणि त्यात शेण खत व गोमूत्र टाकण्यात येते. या बाजूला खास विशिष्ट प्रकारचे चौकोनी पिट बांधण्यात आले असून, यामध्ये आठ दिवसांनी खड्ड्यातील कुजलेला कचरा टाकण्यात येतो. कचºयापासून खतनिर्मिती येथे करण्यात येत असून, या पिटमध्ये खास खाचे व या पिटमधून दुसºया पिटमध्ये गांडुळांना ये-जा करण्यासाठी खास पॅसेज ठेवण्यात आल्यामुळे, येथे गांडूळ आतमध्ये ये-जा करू शकतील, तसेच कोणत्याही हवामानात तग धरू शकतील, अशी खास रचना येथे करण्यात आली आहे, तसेच येथे गांडूळ खतनिर्मितीसाठी वापरण्यात येणाºया पाण्यावर प्रक्रिया करून, परत महिन्याला २५० लिटर्स व्हर्मी पाणी मिळत असून, ते येथील फळे व फुलेनिर्मितीसाठी उपयोगात आणले जाते. हा प्रकल्प बघण्यासाठी पर्यटक, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, सोसायट्यांचे पदाधिकारी येथे भेटी देत आहेत.