Join us

गॅस पाइपलाइनमुळे शेतीचे नुकसान

By admin | Published: January 13, 2015 10:19 PM

खालापूर तालुक्यातून जात असलेल्या गॅस पाइपलाइनमुळे शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती निर्माण झाली आहे

खालापूर : खालापूर तालुक्यातून जात असलेल्या गॅस पाइपलाइनमुळे शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती निर्माण झाली आहे. उरण ते पुणे शिक्रापूर अशी ही पाइपलाइन रस्त्यालगत जाणार असून त्याचे काम युद्धपातळीवर काम सुरु आहे. या पाइपलाइनमुळे रसायनी परिसरातील अनेक गावांमधील शेतीचे नुकसान झाले आहे. हिंदुस्थान पेट्रोकेमिकल कंपनीच्या माध्यमातून उरण येथून पुणे शिक्र ापूरपर्यंत राज्य मार्ग आणि मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गालगत गॅस पाइप लाइन जाणार असल्याने त्यासाठी ठेकेदाराने उत्खनन करून पाइप टाकण्याचे काम सुरु केले आहे. रसायनी, तुराडे, बोरीवली, वाशिवली, तळवली, लोहोप, वानिवली, वडगाव, माजगाव, पौध आदी गावांतील राज्य मार्गालगत असणाऱ्या शेतजमिनीमधून ही पाइपलाइन जात आहे. संबंधित कंपनीकडून पाइपलाइन टाकण्यासाठी कसल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देताच शेतीचे उत्खनन सुरु करण्यात आले आहे . शेतकरी अरुण जाधव, धनाजी पाटील, जयवंत पाटील आदी शेतकऱ्यांची पाइपलाइनला विरोध केला असून खालापूर तहसील कार्यालयाकडे तक्र ारी अर्ज दिला आहे. रस्त्याच्या मध्यभागापासून पंधरा मीटर अंतरावर काम करण्याचे नियम असताना ते पायदळी तुडविले जात असून उत्खनन करून निघणारे दगड, मातीचे ढिगारे शेतीमध्ये टाकण्यात येत असल्याने बांधबंदिस्तीसह शेतीचे नुकसान होत आहे. दिवसरात्री रस्त्यालगत काम सुरु असून रस्ता सुरक्षेसंदर्भात कोणतीही उपाययोजना पाळण्यात येत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून उत्खनन करताना रॉयल्टी बुडविली जात असल्याचे समोर आले आहे . शेतीचे होणाऱ्या नुकसानीबाबत भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी असून एचपीसीएल, सार्वजनिक बांधकाम विभाग, काम करणारा ठेकेदाराकडून शेतकऱ्यांची पिळवणूक सुरु असल्याची भावना शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. (वार्ताहर)