नागपूरच्या शेतकऱ्याने केला फोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:06 AM2021-05-31T04:06:41+5:302021-05-31T04:06:41+5:30
नागपूरच्या शेतकऱ्याने केला फोन नागपूरच्या शेतकऱ्याने जमिनीच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन केल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
नागपूरच्या शेतकऱ्याने केला फोन
नागपूरच्या शेतकऱ्याने जमिनीच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन केल्याचे स्पष्ट झाले आहे. या तपासात बाकी काहीही आक्षेपार्ह असे सापडले नाही. त्यामुळे हा हॉक्स कॉल असल्याचे स्पष्ट झाले. तांत्रिक पुराव्याच्या मदतीने तो कॉल नागपूरमधून आल्याचे समजताच पोलिसांनी नागपूर पोलिसांच्या मदतीने मांढरेला ताब्यात घेतले.
मांढरेकडे केलेल्या चौकशीत, ते गेल्या दोन दशकापासून जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून झगडत होते; मात्र कोणीही त्याची दखल घेत नव्हते. मांढरे यांची ७ एकर जमीन आहे. १९९७ मध्ये त्यातील काही जमीन डब्ल्यूसीएल कंपनीला विकली; मात्र त्याचा मोबदला मिळाला नाही. यामुळे ते मानसिक तणावात होते. अखेर प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याचे नागपूर पोलिसांना सांगितले आहे. मरीन ड्राइव्ह पोलिसांनी याप्रकरणी मांढरेविरुद्ध गुन्हा नोंदवत याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.