लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी असलेले बाळकृष्ण पालकर ४० फूट उंच नारळाच्या झाडावरून पडले आणि त्यांच्या पाठीच्या कण्याला आणि पायाला इजा झाली. त्यांना गोव्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्या पाठीच्या कण्याची आणि पायाच्या फ्रॅक्चरची शस्त्रक्रिया झाली, परंतु त्यांच्यात सुधारणा दिसत नव्हती. एक महिन्याहून अधिक काळ ते रुग्णालयात होते. संपूर्ण काळ ते अंथरुणाला खिळून होते. या वेळी नातेवाईकांनी पर्यायी उपचाराचा शोध घेताना, ‘सेल्युलर थेरपी’मुळे या शेतकऱ्याला नवसंजीवनी मिळाली असून, अवघ्या १५ दिवसांत स्वत:च्या पायावर उभे राहणे शक्य झाले आहे.पालकर यांच्या नातेवाईकांना पेशीवर आधारित उपचार पद्धतीविषयी माहिती मिळाली. त्यांनी त्वरित डॉ. प्रदीप व्ही. महाजन यांची भेट घेतली. एप्रिल महिन्यात खर्चाकरिता सेवाभावी संस्थांच्या मदतीने मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल केले. आर्थिक मदत मिळाल्यानंतर मे महिन्यात त्यांनी पेशीवर आधारित ‘सेल्युलर थेरपी’ उपचारपद्धतीची तीन सत्रे घेतली आहेत. त्यानंतर, आता पालकर कुणाच्याही मदतीशिवाय आरामात बसू शकतात आणि लेग स्प्लिंट्स व वॉकरच्या आधारे उभे राहतात. या उपचारांविषयी डॉ. प्रदीप व्ही. महाजन सांगितले की, ‘त्यांच्या पाठीच्या कण्यात आणि पायाच्या स्नायूंमध्ये विलक्षण सुधारणा दिसून आली आहे. त्यांना वॉकरच्या आधाराची आवश्यकता लागते, पण ते स्वत:हून उभे राहू शकतात आणि चालू शकतात. जेव्हा ते दाखल झाले होते, तेव्हा अंथरुणाला खिळून होते. त्या परिस्थितीशी तुलना करता, थोड्या काळात झालेली ही महत्त्वाची सुधारणा आहे. पालकर यांना फिजिओथेरपी व्यायाम, न्युरोमस्क्युलर स्टिम्युलेशन घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शरीरातील विरल मध्यजनस्तर पेशींमध्ये (मेसेन्शिमल) विविध प्रकारच्या पेशींमध्ये विकलित होण्याची क्षमता असते. या प्रकरणामध्ये त्या चेता आणि स्नायूंच्या पेशींमध्ये विकलित झाल्या. त्याचप्रमाणे, आजूबाजूला असलेल्या पेशींना आजार बरा करण्यास आणि पुनर्निर्मिती करण्यास या पेशी उद्युक्त करतात.’
शेतकऱ्याला मिळाली नवसंजीवनी
By admin | Published: June 27, 2017 3:38 AM