कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांनाही नव्या वर्षात लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 05:18 AM2020-02-17T05:18:17+5:302020-02-17T05:19:01+5:30
शरद पवार यांचे संकेत : एल्गार परिषदेच्या चौकशीवर ठाम
जळगाव : शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे. या पूर्वीच्या योजनेत जे शेतकरी यापासून वंचित राहिले आहे, त्यांनाही याचा लाभ मिळावा यासाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. नवीन आर्थिक वर्षापासून सर्वच शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकेल, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जळगावात दिले.
जैन इरिगेशच्यावतीने आयोजित डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्काराचे वितरण सोहळ््यासह तीन कार्यक्रमांसाठी पवार दोन दिवसांच्या जळगाव दौºयावर आले होते. रविवारी सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. कोरेगाव-भीमा आणि पुण्यातील एल्गार परिषद ही दोन्ही प्रकरणे वेगळी आहेत. मी ती बारकाईने तपासली आहेत. एल्गार परिषदेत काही कवींनी भीमा-कोरेगाव प्रकरणावर कविता सादर केली. त्याचा आशय म्हणजे ‘बघ्याची भूमिका घेणाºयांना आग लावू’ असा होता. ही एक प्रकारे चिथावणी असल्याने त्यांना अटक झाली व संबंधितांनी देशद्राही ठरविले. कवितेतून व्यक्त होणे देशद्रोह कसा होऊ शकतो, याच्याविरुद्ध मी भांडत आहे. पोलिसांनी या प्रकरणात केलेली कारवाई संशयास्पद आहे, त्याची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत झाली पाहिजे. याबाबत मी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पत्रही दिले आहे. त्यात जर खरेच कोणी दोषी आढळले तर माझी हरकत नाही, मात्र चौकशी व्हायला हवी.
उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी या प्रकरणातील पोलीस अधिकाºयांसोबत बैठक घेऊन काही बाबींची विचारणा केली. त्यात कोरेगाव-भीमा प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे केंद्र सरकारच्या लक्षात आले. म्हणूनच सकाळी बैठक झाल्यानंतर दुपारी ४ वाजता लगेच केंद्राने तपास राज्याकडून काढून घेत राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवला. हे प्रकरण भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झाले असल्याने यातील सत्य दडपण्यासाठी राज्य सरकारकडून याचा तपास काढून घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजपमध्ये ज्योतिष समजणारा वर्ग
महाविकास आघाडीचे सरकार कधीही कोसळून आम्ही सत्तेत येऊ, असे भाकीत सध्या भाजप नेते व्यक्त करीत आहेत. यावर पवार म्हणाले की, आम्ही खेड्यापाड्यात राहणारे लोक आहोत. आम्हाला कुठे ज्योतिष कळते. ज्योतिष समजणारा वर्ग भाजपमध्ये जास्त आहेत. त्यामुळे ते कदाचित असे म्हणत असतील.