मुंबईतील कचरा खताच्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या शेतात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 06:13 AM2019-09-02T06:13:58+5:302019-09-02T06:14:00+5:30
पालिकेने शोधला उपाय : १६ गृहनिर्माण सोसायट्यांचा प्रतिसाद
शेफाली परब-पंडित
मुंबई : मोठ्या गृहनिर्माण संस्थांनी कचºयावर प्रक्रिया करून बनविलेले खत घेण्यासाठी ग्राहक मिळत नसल्याने महापालिकेपुढे मोठे संकट उभे राहिले होते. दररोज तयार होणारे शेकडो मेट्रिक टन खत वापरणार कुठे? असा प्रश्न निर्माण झाला होता. आता हा तिढा सुटला आहे. आपले उत्पादन विक्रीसाठी मुंबईत घेऊन येणाºया शेतकऱ्यांना हे खत देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, १६ सोसायट्यांनी तयार केलेले खत शेतकºयांना देण्याची तयारी दाखविली आहे.
मुंबईत तयार होणाºया कचºयाचा भार कमी करण्यासाठी महापालिकेने मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना त्यांच्या आवारात ओला कचºयावर प्रक्रिया करणे सक्तीचे केले आहे. मात्र, या सोसायट्यांनी तयार केलेल्या खताचा पुरवठा कुठे करायचा? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे हे खत शेतकºयांना देण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले होते. गृहनिर्माण सोसायट्या आता याला प्रतिसाद देऊ लागल्या आहेत. शेतकºयांच्या संघटनेमार्फत या १६ सोसायट्यांमधील खताची तपासणी करून ते शेतीसाठी उपयुक्त आहे का? याची चाचपणी केल्यानंतर संघटना खत घेण्याबाबतचा निर्णय घेईल. त्यानंतर, महापालिका त्या सोसायट्यांमधून खत उचलून शेतकºयापर्यंत पोहोचविणार आहेत. त्याचबरोबर, गृहनिर्माण सोसायट्यांना खतनिर्मितीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे.
सोसायट्यांना मालमत्ता करात मिळणार सूट
च्मुंबईतील कचºयाचे प्रमाण कमी करण्यासाठी दररोज १०० किलो कचरा निर्माण करणाºया अथवा ५०० चौ.मी. जागेत असलेल्या गृहनिर्माण सोसायट्या, व्यवसायिक आस्थापना, हॉटेल्सना ओला कचºयावर प्रक्रिया करण्याची सक्ती २०१७ मध्ये महापालिकेने केली.
च्मुंबईत ३,३६३ मोठ्या सोसायट्या आहेत. यापैकी ५० टक्के सोसायट्याच ओल्या कचºयावर प्रक्रिया करीत आहेत.
च्मुंबईत दररोज नऊ हजार मेट्रिक टन कचरा तयार होत होता. महापालिकेने गेल्या दोन वर्षांत कचºयावर प्रक्रिया सक्तीची केल्यामुळे आता कचºयाचे प्रमाण सात हजार दोनशे मेट्रिक टनवर आले आहे.
च्ओल्या व सुक्या कचºयावर प्रक्रिया करणाºया सोसायट्यांना मालमत्ता करामध्ये प्रत्येकी पाच टक्के सूट मिळणार आहे.
शेतकºयांची संघटना असलेल्या स्वामी समर्थ असोसिएशनचे प्रतिनिधी गृहनिर्माण सोसायट्यांमधील खताची तपासणी करीत आहेत. खत उचलण्याबाबत त्यांनी निर्णय घेतल्यास ते खत उचलून त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येईल.
- किरण दिघावकर, सहायक आयुक्त - जी उत्तर