शेतकऱ्यांना कर्जमाफी अन् शहरातील पदवीधरांना 100 दिवसांत नोकरी, राष्ट्रवादीचा जाहीरनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 04:22 PM2019-03-25T16:22:58+5:302019-03-25T16:27:05+5:30
देशातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या 25 वर्षे वयाखालील आहे. त्यापैकी केवळ 2.3 टक्के नागरिकांनाच रितसर कौशल्य प्रशिक्षण मिळते.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने आपला निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना सरसरकट कर्जमाफी तर पदवीधर तरुणांना नोकरीची हमी देण्यात आली आहे. तसेच मुलींना पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण मोफत देणार असल्याची घोषणाही राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यात केली आहे. मुंबईत दिलीप वळसे-पाटील तर दिल्लीत राष्ट्रवादीचे सरचिटणीस डीपी त्रिपाठी यांनी जाहीरनामा प्रकाशित केला.
देशातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या 25 वर्षे वयाखालील आहे. त्यापैकी केवळ 2.3 टक्के नागरिकांनाच रितसर कौशल्य प्रशिक्षण मिळते. तर एकूण पदवीधरांपैकी 5 टक्क्यांहूनही कमी जणांना शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी मिळते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आल्यानंतर सर्वांना शिक्षणाची समान संधी मिळावी, यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच शहरी भागातील पदवीधर तरुणांना 100 दिवसांच्या आत नोकरीची हमी देणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या निवडणूकपूर्व प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे.
राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यातील देशातील शेती, आर्थिक विकास, रोजगार निर्मित्ती, सूक्ष्म-लघू आणि मध्यम उद्योगांवर भर, कर सुधारणा, कामगार कायद्यात सुधारणा, भांडवली आणि वित्तीय बाजारपेठांमध्ये सुधारणा, मानव संसाधन विकास, डिजिटल भारतसंदर्भातील धोरण, आरोग्याचा हक्क, महिला व बालकल्याण विकास, युवा आणि क्रीडाविषयक धोरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना, संरक्षणविषयक धोरण, राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण, व्यापारी धोरणे, नागरी विकास, ग्रामिण विकास- पंचायत राज, वाहतूक, पर्यावरण, सामाजिक न्याय, अल्पसंख्यांकासाठी सवलती, मनरेगा, गृहनिर्माण, उत्पन्नातील असमानता या बाबीवर लक्ष केंद्रीत केले आहे.
माजी विधानसभा अध्यक्ष, ज्येष्ठ नेते @Dwalsepatil, मुख्य प्रवक्ते @nawabmalikncp, कोषाध्यक्ष आ. @hemant_takle, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, विश्वास ठाकूर, संजय तटकरे, क्लाईड क्रास्टो, सुधीर भोंगळे यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रकाशित...#NCP2019pic.twitter.com/5cI1QARup2
— NCP (@NCPspeaks) March 25, 2019
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा लोकसभा निवडणूक २०१९ साठीचा संपूर्ण जाहीरनामा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा....https://t.co/5QIOE79RO0
— NCP (@NCPspeaks) March 25, 2019