ग्रामविकासाला चालना देणाऱ्या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:05 AM2021-07-19T04:05:57+5:302021-07-19T04:05:57+5:30

मुंबई : कृषिपंप वीज धोरण २०२० ला प्रतिसाद वाढत असून, या धोरणानुसार वीज बिलांच्या वसुलीमधील तब्बल ६६ टक्के रक्कम ...

Farmers should participate in the scheme which promotes rural development | ग्रामविकासाला चालना देणाऱ्या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

ग्रामविकासाला चालना देणाऱ्या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

Next

मुंबई : कृषिपंप वीज धोरण २०२० ला प्रतिसाद वाढत असून, या धोरणानुसार वीज बिलांच्या वसुलीमधील तब्बल ६६ टक्के रक्कम ही संबंधित ग्रामपंचायत व जिल्ह्यातील कृषी वीज यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे थकबाकीमुक्तीसह ग्रामविकासाला चालना देणाऱ्या या योजनेत सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले आहे.

महावितरणकडून प्राप्त माहितीनुसार, एकूण थकबाकीमध्ये तब्बल ६६ टक्क्यांपर्यंत माफी देणाऱ्या योजनेतून राज्यातील ३ लाख १४ हजार २५५ शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहेत. १२ लाख ७४ हजार १९२ शेतकऱ्यांची थकबाकीमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. गेल्या मार्चपासून कृषिपंप वीज धोरण २०२० च्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. राज्यातील ४४ लाख ४३ हजार २४७ शेतकऱ्यांना यामध्ये कृषिपंपाच्या वीज बिलांतून थकबाकीमुक्त होण्याची संधी आहे. त्यांच्याकडे एकूण ४५ हजार ७७९ कोटी २६ लाख रुपयांची एकूण थकबाकी होती. मात्र, सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट अशी एकूण १५ हजार ९४९ कोटी ९० लाख रुपयांची सूट देण्यात आली. आता धोरणानुसार असलेली थकबाकी म्हणजे ३० हजार ६८४ कोटी ३७ लाख रुपयांपैकी ५० टक्के रक्कम येत्या ३१ मार्च २०२० पर्यंत भरल्यास थकबाकीची उर्वरित ५० टक्के रक्कमदेखील माफ होणार आहे.

---------------------

४४९ कोटी रुपयांची थकबाकी माफ

- ३ लाख १४ हजार २५५ शेतकऱ्यांनी ५० टक्के थकबाकी व चालू वीज बिलांचा भरणा करून वीज बिलातून थकबाकीमुक्त झाले.

- या शेतकऱ्यांकडे धोरणानुसार ८९९ कोटी ८९ लाख रुपयांची थकबाकी होती.

- यातील चालू वीज बिल व ५० टक्के थकबाकी, असा एकूण ५८४ कोटी ७० लाख रुपयांचा भरणा त्यांनी केला.

- त्यामुळे उर्वरित ४४९ कोटी ९३ लाख रुपयांची थकबाकीदेखील माफ झाली.

-------------------

... तर वीज बिल होणार कोरे

- वीज बिलांच्या थकबाकीमुक्तीकडे १२ लाख ७४ हजार १९२ शेतकऱ्यांची वाटचाल सुरू आहे.

- या शेतकऱ्यांनी आतापर्यंत चालू वीज बिल व थकबाकीपोटी १ हजार २८९ कोटी २ लाख रुपयांचा भरणा केला आहे.

- त्यांनी भरलेल्या थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम, सूट, विलंब आकार, व्याजातील सूट, अशी ३ हजार ८३१ कोटी ८० लाख सूट या शेतकऱ्यांना मिळाली.

- या शेतकऱ्यांनी शिल्लक असलेल्या थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम ३१ मार्च २०२२ पर्यंत भरल्यास उर्वरित थकबाकी माफ व वीज बिल कोरे होणार.

-------------------

वीज बिलांमधून संपूर्णपणे थकबाकीमुक्त शेतकरी

पुणे प्रादेशिक : १ लाख ६४ हजार ८१३

कोकण : ८९ हजार ४२२

नागपूर : ४५ हजार ७५२

औरंगाबाद प्रादेशिक : १४ हजार २६८

Web Title: Farmers should participate in the scheme which promotes rural development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.