ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - कर्जमाफीच्या मुद्यावरून राज्य सरकार आणि शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत असून , निर्णय प्रक्रियेत सुकाणू समितीला डावलण्यात येत असल्याचा आरोप सुकाणू समितीचे सदस्य अजित नवले आणि विश्वास उटगी यांनी केला आहे.
शेतकऱ्यांची सुकाणू समिती आणि राज्य सरकारचा मंत्रिगट यांच्यात कर्जमाफीचे निकष ठरवण्यासाठी बैठक होणार आहे. मात्र या बैठकीपूर्वीच सुकाणू समितीच्या सदस्यांनी राज्य सरकारच्या भूमिकेविषयी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना नाराजी व्यक्त केली. नाराजी व्यक्त केली. कर्जमाफीसाठीच्या सरकारी अध्यादेशात जाचक अटी असल्याचा आरोप , सुकाणू समितीच्या सदस्यांनी दिला आहे. तसेच दहा हजार रुपयांचे कर्ज देण्याची मागणी शेतकऱ्यांची मागणी नव्हती, 10 हजारांचे तुकडे फेकणे बंद करा, असेही त्यांनी सरकारला सुनावले आहे.