Join us

BREAKING: नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 7:03 PM

राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आता ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज घेता येणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आता ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज घेता येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतचे पिककर्ज बिनव्याजी उपलब्ध करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली आहे. 

राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय यावेळी घेण्यात आले. मंत्रिमंडळाच्या मान्यतेमुळे पिककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना आता ३ लाख रुपयांपर्यंतचे पिककर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळू शकणार आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर हा आणखी एक महत्वाचा निर्णय मानला जात आहे. यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना १ लाख रुपयांपर्यंतच बिनव्याजी कर्ज मिळत होतं. त्यात वाढ करून आता शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज घेता येणार असल्यानं शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. शेतकऱ्यांसाठीच्या बिनव्याजी कर्जाच्या निर्णयावरील शिक्कामोर्तबासह आणखी काही निर्णय आज घेण्यात आले आहेत. 

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे...

  • राज्याच्या किनारपट्टीत कांदळवन प्रवाळ  संवर्धन, उपजीविकेलाही प्रोत्साहन, ग्रीन क्लायमेट फंडाचे सहाय्य
  • नाशिक येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मॉडेल आयटीआय
  • तीन लाखांपर्यंत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज, दोन टक्के व्याज दर सवलत दिल्याने लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार
  • दुय्यम न्यायालय आणि  मुंबई नगर दिवाणी व सत्र न्यायालय येथे जिल्हा सरकारी वकील आणि सहाय्यक सरकारी वकील नेमणार
  • शहरांमध्ये प्राचीन अतिप्राचीन वृक्षांचे संरक्षण करणार , हेरिटेज ट्री संकल्पना
  • महाराष्ट्र परिचर्या परिषदेवर पूर्वलक्षी प्रभावाने मुदतवाढ
टॅग्स :उद्धव ठाकरेशेतकरीमहाराष्ट्रअजित पवार