Join us

शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे जानेवारीत मिळणार; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 9:16 AM

रायगड जिल्ह्यातील तळा महसूल मंडळातील ७ हजार ५००  शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजनेत सहभाग घेतला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे व्याजासह येत्या ३  जानेवारीपूर्वी अदा करावेत, असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी  गुरुवारी दिले.

रायगड जिल्ह्यातील तळा महसूल मंडळातील ७ हजार ५००  शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यापैकी साडेतीन हजार  शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यात आली आहे. मात्र, महसुली मंडळाच्या विभाजनाच्या तांत्रिक मुद्यावरून भारतीय कृषी विमा कंपनीने २ हजार ९४० शेतकऱ्यांची नऊ  कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम अदा केलेली नाही. 

यासंदर्भात  महिला आणि  बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या पुढाकाराने गुरुवारी मंत्रालयात मुंडे यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत मुंडे यांनी पैसे अदा करण्याबाबत विमा कंपन्यांना सूचना केली. या बैठकीला  आ. अनिकेत तटकरे, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले. तसेच, भारतीय कृषी पीकविमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक एम.एस. सावंत, कृषी अधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :धनंजय मुंडेशेतकरीशेती क्षेत्र