‘शेतकरी हिताला धक्का लावणारे निर्णय घेणार नाही’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 05:40 AM2021-07-02T05:40:58+5:302021-07-02T05:41:19+5:30

कृषी दिनानिमित्त माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

‘Farmers will not take decisions that hurt their interests’ | ‘शेतकरी हिताला धक्का लावणारे निर्णय घेणार नाही’

‘शेतकरी हिताला धक्का लावणारे निर्णय घेणार नाही’

googlenewsNext
ठळक मुद्दे शेती व्यवसायातील अनिश्चितता लक्षात घेऊन त्यात धाडसाने पाऊल टाकणाऱ्या बळीराजाला ताकद देण्याचे काम राज्य शासन करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शेतकरी महाराष्ट्राचे वैभव असून त्यांच्या हिताला धक्का पोहोचेल, असे निर्णय घेणार नाही. राज्याचे हरित वैभव वाढण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी येथे सांगितले. कृषी विभागातर्फे राबविण्यात आलेल्या कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप झाला. यावेळी नाशिक येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले होते.

कृषी दिनानिमित्त माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. शेती व्यवसायातील अनिश्चितता लक्षात घेऊन त्यात धाडसाने पाऊल टाकणाऱ्या बळीराजाला ताकद देण्याचे काम राज्य शासन करीत आहे. राज्यात दुष्काळ, पूर, गारपीट, कोरोना असे संकट आले; मात्र शेतकरी डगमगला नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. शेतकरी जे पिकवेल ते विकले गेले पाहिजे. त्याला हमी भाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विचार मांडले. कृषी संजीवनी मोहिमेत शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात आले. त्याचा लाभ ७ लाख शेतकऱ्यांना झाला, अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली.  

Web Title: ‘Farmers will not take decisions that hurt their interests’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.