पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतातुर
By admin | Published: June 29, 2014 11:30 PM2014-06-29T23:30:52+5:302014-06-29T23:30:52+5:30
जून महिला संपत असला तरी पाऊस बरसत नसल्याने सर्वच निसर्गाच्या लहरीपणाबद्दल चिंतातूर झाले आहेत.
Next
>बोर्लीपंचतन : जून महिला संपत असला तरी पाऊस बरसत नसल्याने सर्वच निसर्गाच्या लहरीपणाबद्दल चिंतातूर झाले आहेत. तर गर्मीने अजुनही पाठ सोडली नाही. भातशेतीसाठी शेतक:यांनी पावसाच्या भरोशावर पेरणी केली. परंतू पाऊस अगदी कमी झाल्याने रोपांच्या वाढीसाठी शेतामध्ये पाणीच नसल्याने डोके वर काढलेली रोपे सुकून गेली आहेत.अजुन 4-5 दिवसांत वरुणराजा बरसला नाही तर रोपे पूर्णत: उन्हाने करपून जातील व दुबार पेरणीशिवाय पर्याय राहणार नसल्याची चिंता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. तर धरणांमध्ये पाणीसाठा खूप कमी असल्याने पाणीपुरवठा करतानाही ग्रामपंचायतीची कसरत होत आहे. पाच दिवसानंतरही काही भागात पाणीपुरवठा बंद होता.
o्रीवर्धन तालुक्यामध्ये चालू वर्षी 26 जूनर्पयत 145 मी.मी. फक्त पावसाची नाेंद झाली आहे. ही सर्व आकडेवारी कार्ले लघुपाटबंधारे कार्यालयाकडून देण्यात आली. नुकत्याच वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार पाऊस उशिराने जुलै महिन्यामध्ये पडेल व सरासरी गाठेल असे सांगितले आहे. शिवाय पुढे पाऊस कसा होतो हे पहावे लागेल. परंतू सद्यस्थितीत पाऊस लांबल्याने शेतकरी वर्ग अधिक चिंतातुर असून पावसाची वाट पहात आकाशाकडे नजरा लावून बसला आहे. शेतामध्ये पावसाच्या भरोशावर केलेली पेरणी डोके वर काढीत असताना जी पावसाचा आवश्यकता असते ती नसल्याने भातशेती जमीन पूर्ण सुकून गेली आहे. तर रोपे पिवळी पडत चालली आहेत. 4/5 दिवसांत पाऊस आवश्यक तेवढा न झाल्यास रोपे करपून जातील व दुबार पेरणीचे संकट ओढवेल अशी चिंता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
4दिवेआगर, बोर्लीपंचतन, भरडखोल व अन्य छोटी खेडी अशा सुमारे 3क् हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा करणा:या कार्ले लघूपाटबंधारे धरणात जेमतेम म्हणजेच 2क्/25 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याने पाणीप्रश्नही जटील होणार आहे.
4बोर्लीपंचतनसाठी 2.5 कोटी खर्चून करण्यात आलेली पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली नसल्याने ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करताना कसरत करावी लागत आहेत. याबाबत सरपंच गणोश पाटील यांनी सांगितले की, नवीन योजनेचे वितरणाच्या पाईप लाईनचे थोडे काम बाकी असून ग्रामपंचायतीकडे वर्ग केली नसल्याचे सांगितले. एकंदरीत पाऊस लांबल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरणच पसरल्याचे चित्र आहे.
4मोहोपाडा-रसायनी : पावसाने दडी मारल्याने शेतात पेरलेला राब करपून जाणार या भीतीने बळीराजा चिंतातून दिसत असून शेतातील राब वाचविण्यासाठी कृत्रिमरित्या पाण्याची व्यवस्था करण्यात बळीराजा गुंतल्याचे दिसत आहे. पेरलेल्या धान्याला उत्तम अंकुर आल्याने शेतकरी आनंदित होता. मात्र राब तयार होण्यासाठी पावसाची आवश्यकता असतानाच वरूणराजाने पाठ फिरवल्याने राब करपण्यास सुरुवात
झाली आहे.
4आलेले राब वाचविण्यासाठी काही शेतक:यांची धडपड सुरू झाली असून शेतात कृत्रिमरित्या पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचे चित्र परिसरात दिसत नसल्याने दुबार पेरणी करावी लागणार असेही काही शेतक:यांनी बोलताना सांगितले.
4वरूणराजा रुसल्याने शेतीची कामेही खोळंबली असून शेतातील राब करपून जावू नये म्हणून आम्ही पाणी आणून शेतातील राबाला देत असल्याचे बारवई येथील शेतकरी आत्माराम पाटील यांनी सांगितले.
4चौक : शेतक:यांनी महागडे भाताचे बियाणो पेरून त्यांचा चांगला झालेला रूजवा असून सुध्दा 8 जूनला सुरू झालेले मृग नक्षत्र 22 जूनला सुरू झालेले आद्र्रा नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकरी अगदी चिंतातूर झाला असून आकाशाकडे नजर लावून चातकासारखी पावसाची वाट पाहत आहे.
4 पावसच्या अडवणुकीमुळे भाजीपाला महागला आहे. कांदा महागला आहे, रानभाज्यांना चांगले दिवस आले आहेत. 115 ते 125 दिवसांत होणारी भात पिके, त्यांना पुरेसा कालावधी मिळणार नसल्याने त्याचा फटका शेतक:यांना बसणार आहे. सर्वत्र पावसाच्या अभावामुळे शेतजमिनी सुकल्या असून भाताचे रान सुकू लागले आहेत. पावसाच्या पुनरागमनानंतर शेतक:यांना के व्हा दिलासा मिळणार अशी चिंता आहे.
4कदाचित शेतक:यांना पुन्हा भाताची पेरणी करावी लागणार असल्याने शासनाने हळव्या जातीची बियाणी पुरवावीत अशी शेतक:यांची मागणी आहे. डिझेल, पेट्रोल, गॅस यांच्या वाढत्या किमती बरोबर रेल्वे भाडेवाढ यांनी सारे त्रसले असताना पावसाची नाराजी आहे.