Join us  

तलवारीने केक कापण्याची फॅशन... आणि पोलीस ठाण्यात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या काही दिवसांत तलवारीने केक कापून त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याची फॅशन पाहावयास मिळते आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या काही दिवसांत तलवारीने केक कापून त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याची फॅशन पाहावयास मिळते आहे. काही ठिकाणी हातात तलवारी घेऊन परिसरात दहशत पसरविण्याचाही प्रयत्न करतात. याच फॅशनमुळे त्यांना कोठडीची हवा खावी लागत आहे.

वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापणाऱ्या तुषार थोरात (३०), तसेच त्याच्या मित्राविरोधात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायगाव परिसरात तुषारने मित्राने आणलेल्या तलवारीने केक कापला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पुढे ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच हत्यारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवत पोलीस अधिक तपास करत आहेत.

अशाच प्रकारे काही जण हातात तलवारी घेऊन परिसरात दहशत पसरविण्याचाही प्रयत्न करतात. पोलिसांच्या हाती याबाबतचे व्हिडिओ अथवा माहिती लागताच त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येत आहे.

....

कट्टा, तलवार अन् चाकू...

यात तलवारीबरोबर काही ठिकाणी हातात कट्टा, चाकू घेऊन सोशल मीडियावर व्हायरल करून दादागिरीचे प्रकारही पाहावयास मिळतात. मात्र, मुंबई पोलिसांकडून अशी घटना समोर येताच तात्काळ कारवाई करण्यात येते. त्यामुळे अशा घटनांचे प्रमाण कमी आहे.

....

सर्व घडामोडींवर मुंबई पोलिसांचा वॉच

सोशल मीडियावरिल सर्व हालचालींवर पोलिसांचे विशेष लक्ष असते, तर दुसरीकडे अशात गुंडागर्दीच्या व्हिडिओला प्रोत्साहन देणाऱ्याविरुद्धही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.