मुंबई : फॅशन जगतात चर्चेचा विषय ठरलेल्या ‘फॅशनिस्टा’ची आॅडिशन नुकतीच मुंबईतील डी. एन. वैद्य सभागृहात पार पडली. ठाण्यानंतर मुंबईत पार पडलेल्या या आॅडिशनमध्ये पुणे, नाशिक आणि राज्याच्या कानाकोपºयातून शेकडो मुला-मुलींनी आपल्या कलेचे सादरीकरण केले. अशा प्रकारे आता एकूण २० मुले व २० मुलींची निवड वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात १६ फेब्रुवारी रोजी रंगणाºया अंतिम फेरीसाठी झाली आहे. या स्पर्धकांचे ग्रुमिंग १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. तुषार नॅशनल हेअर अँड ब्युटी अकॅडमीने ‘फॅशनिस्टा’चे आयोजन केले असून, सखी मंच या इव्हेंटचे मीडिया पार्टनर आहे.फॅशनिस्टाचे आयोजक व हेअर स्टाईलिस्ट तुषार चव्हाण म्हणाले, ठाणे आणि मुंबई आॅडिशनमध्ये यशस्वी ठरलेल्या स्पर्धकांना तीन दिवसांचे ग्रुमिंग दादरच्या एल. जे. ट्रेनिंग सेंटरवर दिले जाईल. म्हणजेच त्यांची पूर्वतयारी करून घेतली जाईल. या तयारीत त्यांना अभिनेत्री आणि फॅशनिस्टाची ब्रँड अॅम्बेसेडर पूजा सावंत व कोरियोग्राफर मयूर वैद्य प्रत्यक्ष मार्गदर्शन करतील. मुलांच्या कॉश्च्यूम डिझायनिंगची जबाबदारी आसावरी पाटील, तर मुलींच्या कॉश्च्यूम डिझायनिंगवर रोझी बोन्स या फॅशन डिझायनर काम करणार आहेत. सर्व स्पर्धकांच्या हेअर स्टाईल व मेकअपसाठी नॅशनल हेअर क्राफ्टमधील सिद्धेश चव्हाण, संपदा नार्वेकर, मिलिंद चव्हाण, सचिन कदम आणि प्रवीण जाविर, न्यूट्रिशन डाएटिस्ट मंदार रेडीज स्पर्धकांना फिटनेस टिप्स देतील, तर इव्हेंटची कोरियोग्राफी कोरियोग्राफर भूषण मालंडकर करतील.या इव्हेंटमध्ये ‘मिस्टर फॅशनिस्टा’ व ‘मिस फॅशनिस्टा’सोबत आणखी आकर्षक अवॉर्ड्सचा समावेश केल्याची माहिती आयोजक सचिन पवार यांनी दिली. पवार म्हणाले की, ग्रँड फिनालेला होणाºया ट्रॅडिशनल राउंड आणि इंडो-वेस्टर्न राउंडमध्ये एकूण ४० स्पर्धकांपैकी प्रत्येकी १० मुले व १० मुली अशी एकूण २० स्पर्धकांमध्ये ग्रँड फिनाले रंगेल. या एकूण २० स्पर्धकांमधून प्रमुख विजेत्यांसह प्रत्येकी दोन मुले आणि दोन मुलींची निवड उपविजेते म्हणून केली जाईल. याशिवाय ‘बेस्ट स्माइल’, ‘बेस्ट हेअर’, ‘बेस्ट पर्सनॅलिटी’ आणि ‘पॉप्युलर फेस आॅन फेसबुक’ या अवॉडर््सचाही समावेश आहे. ‘बेस्ट हेअर’चे अवॉर्ड राजन दळींच्या हस्ते दिला जाईल, तर पूर्वी भावे व ओमप्रकाश शिंदे हे सेलिब्रिटी सूत्रसंचालन करतील.
‘फॅशनिस्टा’ची चुरस वाढली, फायनल आॅडिशन मुंबईत रंगली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 2:46 AM