Join us  

आझाद मैदानात आप पार्टीचा फास्ट फॉर केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2024 7:39 PM

लोकसभेत भाजप आणि मोदीचा पराभव अटळ असल्याचे मुद्दाम अशी कारस्थान सुरू असल्याचे सरचिटणीस पायस वर्गीस यांनी सांगितले.

 श्रीकांत जाधव  

मुंबई: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ  आपच्या मुंबईतील पदाधिकारी आणि समर्थकांनी रविवारी आझाद मैदानात 'फास्ट फॉर केजरीवाल'चे आयोजन केले होते. यानिमित्त दिवसभर कार्यकर्त्यांनी महाउपवास धरून उपोषण केले.                                                                                                                                मुंबईतील आपचे कार्याध्यक्ष रुबेन मस्करेन्हास, सरचिटणीस पायस वर्गीस, उपाध्यक्ष संदीप कटके, संदीप मेहता यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील क्रांतिकारी कवींची देशभक्तीपर गाणी सादर करत महाउपवास केला. यावेळी उपोषणकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढविला. केजरीवाल यांची अटक म्हणजे त्यांच्या मूलभूत अधिकारांचे गंभीर उल्लंघन आहे. देशाच्या लोकशाही रचनेवर हा थेट हल्ला आहे. न्याय, समानता आणि लोकांचा आवाज कायम राखण्यासाठी समर्पित पक्ष म्हणून आम्ही अशा अन्यायाला तोंड देण्यास उभे आहोत असे कार्याध्यक्ष मस्करेन्हास म्हणाले.

तर लोकसभेत भाजप आणि मोदीचा पराभव अटळ असल्याचे मुद्दाम अशी कारस्थान सुरू असल्याचे सरचिटणीस पायस वर्गीस यांनी सांगितले. भाजप सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. निवडणूक बाँड घोटाळ्यामुळे चालवलेले खंडणी रॅकेट आणि व्यवहार उघडकीस आले असल्याने भाजपने केजरीवाल याना अटक केले असे संदीप कटके यांनी आपल्या भाषणात सांगितले. या महा उपोषणास मोठ्या संख्येने आपचे मुंबईतील कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :मुंबईअरविंद केजरीवाल