लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पश्चिम रेल्वेने बारा डब्यांच्या अतिरिक्त ११ लोकल फेऱ्या उद्यापासून वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर आता लोकल फेऱ्यांची एकूण संख्या १,३८३ वरून १,३९४ पर्यत पोहचणार आहे. त्यामुळे प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, उपनगरी विभागात प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी, पश्चिम रेल्वेने अकरा अतिरिक्त बारा डब्यांच्या सध्या लोकल फेऱ्या प्रायोगिक तत्त्वावर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
नव्याने सुरू होणाऱ्या जलद लोकल सेवा बोरीवली आणि वांद्रे स्थानकांवर प्रायोगिक तत्त्वावर थांबणार नाहीत. तसेच सध्याच्या काही लोकल सेवांच्या वेळापत्रकात किरकोळ बदल करण्यात येणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली.
नवीन लोकल फेऱ्या
अप मार्गावरील
- स. ९.४० गोरेगाव चर्चगेट स्लो
- स १०.४२ विरार- दादर फास्ट
- स. ११.५० गोरेगाव- चर्चगेट स्लो
- दु. १.५३ विरार-अंधेरी फास्ट
- दु. २.४७ विरार- बोरीवली फास्ट
डाऊन मार्गावरील
- स. ८.३८ चर्चगेट- गोरेगाव स्लो
- स. १०.५१ चर्चगेट- गोरेगाव स्लो
- दु.१२.०६ दादर- विरार फास्ट
- दु. २.०० अंधेरी- विरार फास्ट
- दु. ३.२३ बोरीवली-विरार फास्ट
- रा. ९.५५ चर्चगेट- वांद्रे धीमी