नेतृत्व बदलाच्या वेगवान हालचाली
By Admin | Published: June 21, 2014 02:18 AM2014-06-21T02:18:47+5:302014-06-21T02:18:47+5:30
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने त्यांना बदलले जाणार, या चर्चेला अधिकच बळ मिळाले आह़े
>मुंबई : राज्याच्या राजकारणात नेतृत्व बदलाच्या दृष्टीने वेगवान हालचाली होत आहेत़ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने त्यांना बदलले जाणार, या चर्चेला अधिकच बळ मिळाले आह़े दरम्यान, निरीक्षक म्हणून राज्यसभेतील काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद आणि माजी संरक्षण मंत्री ए़ के.अँथनी हे रविवारी रात्री मुंबईत येणार आहेत़
सूत्रंनी सांगितले की, मुख्यमंत्री शनिवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतील़ राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आह़े पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री पदावरून जाणार का, याचा फैसला उद्या होईल़ त्यांच्याजागी संभाव्य मुख्यमंत्री म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव आघाडीवर आह़े
याशिवाय कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योगमंत्री नारायण राणो यांचीही नावे चर्चेत आहेत़ राणोदेखील रात्री उशिरा दिल्लीला रवाना झाले असल्याचे समजत़े विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद
पवार यांनीच शुक्रवारी दुपारी मुंबईत राज्यात नेतृत्व बदलाचे संकेत दिले होत़े काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी शनिवारी रात्री परदेशात जाणार असल्याचे सूत्रंनी सांगितल़े (विशेष प्रतिनिधी)