Join us  

जामिनावर जलद गतीने सुनावणी

By admin | Published: November 06, 2015 2:17 AM

बिल्डर सूरज परमार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या ठाण्याच्या चार नगरसेवकांच्या अटकपूर्व जामीनावर जलदगतीने सुनावणी घेण्यात येणार आहे.

मुंबई : बिल्डर सूरज परमार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या ठाण्याच्या चार नगरसेवकांच्या अटकपूर्व जामीनावर जलदगतीने सुनावणी घेण्यात येणार आहे. आधी ही सुनावणी ३ डिसेंबर रोजी ठेवण्यात आली होती. आता ती २३ नोव्हेंबरला ठेवण्यात आली आहे.नगरसेवक विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला, हनुमंत जगदाळे आणि अपक्ष नगरसेवक सुधाकर चव्हाण यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ३ नोव्हेंबर रोजी दिवाळी सुट्टीकालीन न्यायालयाने या चौघांनाही अटकेपासून संरक्षण दिले. सुनावणी ३ डिसेंबर रोजी ठेवली.विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी गुरुवारी पुन्हा सुट्टीकालीन न्यायालयापुढे हे प्रकरण आणत या चौघांच्याही अटकपूर्व जामिनावरील सुनावणी जलदगतीने घेण्याची विनंती न्या. रवी के. देशपांडे यांना केली. त्यांना कोठडीत घेऊन चौकशी करण्याची आवश्यकता आहे. हे अत्यंत संवेदशील प्रकरण असल्याने ३ डिसेंबरपूर्वी नगरसेवकांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती अ‍ॅड. ठाकरे यांनी केली. न्यायालयाने सरकारी वकिलांची विनंती मान्य करत अटकपूर्व जामिनावरील सुनावणी ३ डिसेंबरऐवजी आता २३ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी)