Join us

सलग १८० दिवस उपवास!, जैन मुनींनी रचला इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 4:40 AM

सलग १८० दिवस उपवास करण्याची किमया जैन मुनी हंसरत्नविजयजी महाराज यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा साध्य केली आहे. याआधी अशाचप्रकारे २०१४ साली सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सलग १८० दिवस केवळ कोमट पाणी पिऊन त्यांनी कडक उपवास केले होते.

मुंबई : सलग १८० दिवस उपवास करण्याची किमया जैन मुनी हंसरत्नविजयजी महाराज यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा साध्य केली आहे. याआधी अशाचप्रकारे २०१४ साली सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सलग १८० दिवस केवळ कोमट पाणी पिऊन त्यांनी कडक उपवास केले होते. अशी उपासना करणारे ते एकमेव मुनी असल्याचा दावाही त्यांच्या अनुयायांनी केला आहे. या उपासनेबद्दल त्यांना अंधेरी क्रीडा संकुल येथे शनिवारी होणाऱ्या सोहळ््यात आचार्यपद प्रदान करून गौरवण्यात येणार आहे.दीपक झवेरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथे ७ जानेवारी २०१८ पासून त्यांनी उपासनेला सुरूवात केली होती. शुक्रवारी अंधेरी क्रीडा संकुलात पार पडलेल्या भव्य सोहळ््यात त्यांनी १८० दिवसांची ही उपासना पूर्ण केली. यावेळी हजारो उपासक आणि शेकडो जैन साधू आणि साध्वी उपस्थित होत्या. याचठिकाणी शनिवारी होणाºया सोहळ््यात त्यांना आचार्यपद देऊन गौरवण्यात येणार आहे. आचार्य जगवल्लभ सूरीश्वरजी महाराजांच्या हस्ते त्यांना आचार्यपद बहाल केले जाईल. जगात शांतता आणि अहिंसा वाढीस लागून दहशतवाद नष्ट व्हावा, या हेतूने त्यांनी ही उपासना केल्याचे उपासकांकडून सांगण्यात आले.भगवान महावीर यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणाºया हंसरत्नविजयजी महाराज यांनी गेल्या ४१ वर्षांमध्ये २२ हजार किलोमीटरहून अधिक पायी प्रवास केला आहे. प्रवासात ते कोणत्याही वाहनाचा उपयोग करत नाहीत. इतकेच नाही, तर उपवासादरम्यान सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कोमट पाणी पिऊन ते साधना करतात. सूर्यास्तानंतर पाण्याचा एक थेंबही ते प्राशन करत नाहीत. वयाच्या ५२ व्या वर्षी इतकी कठीण उपासना करणारे ते एकमेव मुनी असल्याचा दावा त्यांचे साधक करतात. सकाळी ८ वाजता अंधेरी येथे होणाºया सोहळ््यात त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी हजारो अनुयायी एकवटतील, असे उपासकांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई