टोलमुक्तीसाठी उपोषण
By Admin | Published: February 2, 2015 02:49 AM2015-02-02T02:49:44+5:302015-02-02T02:49:44+5:30
शासनाने खारघर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमुक्त केले आहे. त्याचप्रमाणे ऐरोली-मुलुंड ब्रिज टोलनाक्यावर ऐरोलीकरांनाही टोल माफ करावा
नवी मुंबई : शासनाने खारघर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमुक्त केले आहे. त्याचप्रमाणे ऐरोली-मुलुंड ब्रिज टोलनाक्यावर ऐरोलीकरांनाही टोल माफ करावा, यासंदर्भात येत्या ८ फेब्रुवारीला लाक्षणिक उपोषण ऐरोली संघर्ष समितीच्यावतीने करण्यात येणार आहे.
सरकारने गेल्या महिनाभरापूर्वी खारघर टोलनाका सुरू केला. या टोलमधून स्थानिक गावांना वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर ऐरोली- मुलुंड येथील टोलनाक्यावरील टोलमधून ऐरोलीकरांना सूट द्यावी, अशी मागणी ऐरोली संघर्ष समितीच्यावतीने केली आहे. या संदर्भात आठ दिवसांपासून ऐरोली विभागात सह्यांची मोहीम राबविण्यात आली होती. शनिवारी ऐरोली संघर्ष समिती आणि नागरिक यांच्यामध्ये शनिवारी एक बैठक झाली. मुलुंड टोल माफ करण्यासाठी सर्व नागरिकांनी एकमत दर्शविले. ८ फेब्रुवारीला सर्व नागरिक लाक्षणिक उपोषण करणार आहेत. ऐरोली सेक्टर ८ येथील सर्कलमध्ये हे उपोषण करण्यात येईल.(प्रतिनिधी)